देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ इतिहास ३३-३६
मनापासून केलेल्या पश्चात्तापाची यहोवा कदर करतो
छापील आवृत्ती
राजा मनश्शे
अश्शूऱ्यांनी त्याला धरून पायांत बेड्या घालून बॅबिलोनला नेलं. यहोवानं हे सर्व होऊ दिलं
बंदिवान म्हणून नेण्याआधी
खोट्या दैवतांसाठी वेद्या बांधल्या
स्वतःच्या पुत्रांचा बळी दिला
निष्पाप लोकांची कत्तल केली
संपूर्ण देशभरात भुताटकीला बढावा दिला
बंदिवासातून सुटल्यानंतर
मनापासून पश्चात्ताप करून स्वतःला नम्र केलं
यहोवाला प्रार्थना केली; अर्पणे केली
खोट्या दैवतांच्या वेद्या पाडल्या
देशातील सर्वांना यहोवाची उपासना करण्याचा आर्जव केला
राजा योशीया
त्याच्या कारकीर्दीत
यहोवाचा शोध केला
यहूदा व जेरूसलेम यांच्यातून खोटी उपासना काढून टाकली
यहोवाचं मंदिर दुरुस्त केलं; नियमशास्त्र सापडलं