फेब्रुवारी २३ च्या सप्ताहाचा आराखडा
२३ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ९ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ३८ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते १९-२१ (८ मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी (२० मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असा.—तीत २:१४, पं.र.भा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: खऱ्या उपासनेकरता येशूसारखा आवेश दाखवा. टेहळणी बुरूज १५ मे २०१३ पृ. ८, परि. २ आणि टे.बु. १५ डिसेंबर २०१० पृ. ९-११, परि. १२-१६ यांतील माहितीवर आधारित भाषण. प्रचारकार्यासारख्या ‘चांगल्या कामाचा’ बहुमान आपल्याला मिळाला आहे यावर जोर द्या. (तीत २:१४) सत्य माहीत असल्यामुळं आपण आवेशानं राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास आणि बायबल अभ्यास घेण्यास प्रवृत होतो ते सांगा. चांगल्या कामांकरता बांधवांनी दाखवलेल्या आवेशासाठी त्यांची प्रशंसा करा.
१० मि: “येशूबद्दलचं सत्य आवेशानं सांगा.” चर्चा. टेहळणी बुरूज १५ मे २०१४, पृ. ८ परि. ८ मधील “पहिली परिस्थिती” याचं प्रात्यक्षिक दाखवा. प्रात्यक्षिकात, पृ. ९ परि. १३ मधील उदाहरणाचा उल्लेख करा.
गीत ५ आणि प्रार्थना