फेब्रुवारी १६ च्या सप्ताहाचा आराखडा
१६ फेब्रुवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १३ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ३७ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते १५-१८ (८ मि.)
क्र. १: शास्ते १६:१३-२४ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: बायबलमध्ये नेमके काय सांगण्यात आले आहे?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. ८ परि. १-४ (५ मि.)
क्र. ३: अपुल्लो—विषय: नम्र, बोलण्यात प्रभावी व आवेशी—प्रेकृ १८:२४-२८; १करिं १:१०-१२; १६:१२ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: “चांगल्या कामांमध्ये आवेशी” असा.—तीत २:१४, पं.र.भा.
१५ मि: आवेशानं सुवार्ता सांगण्याची तयारी करा. चर्चा. साक्षकार्याची तयारी करताना सर्वात आधी आपण यहोवाला प्रार्थना का केली पाहिजे? (स्तो. १४३:१०; प्रे. कृत्ये ४:३१) प्रार्थनेव्यतिरिक्त आपण आणखी काय केलं पाहिजे? (एज्रा ७:१०) यानंतर, आपण साक्षकार्यासाठी कोणकोणतं साहित्य नेऊ शकतो व साक्षकार्यासाठी आपण नेणार असलेल्या बॅगेत आणखी काय असणं आवश्यक आहे? अशा प्रकारे तयारी केल्यानं कोणते चांगले परिणाम घडू शकतात? (टेहळणी बुरूज १५ जुलै २००८, पृ. १०, परि. ९ पाहा.) तुम्ही साक्षकार्याची तयारी कशी करता? एक प्रचारक त्याच्याकडं असणाऱ्या पत्रिका, नियतकालिकं किंवा माहितीपत्रिका यांतील माहितीचा विचार करून साक्षकार्याची तयारी कशी करतो त्याचं एक प्रात्यक्षिक दाखवा. त्यानंतर तो त्याच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणावर व्हिडिओ चालतात की नाही ते पाहतो आणि आपल्या बॅगमध्ये सेवेसाठी लागणाऱ्या इतर गोष्टी आहेत याची खात्री करतो. सेवाकार्याला जाताना सर्वांनी चांगली तयारी केली पाहिजे यावर जोर द्या. (२ तीम. ३:१७)
१५ मि: “या स्मारकविधीच्या काळादरम्यान तुम्ही यहोवा आणि येशू यांच्यासारखा आवेश दाखवाल का?” प्रश्न व उत्तरं. उपस्थित असलेल्या सर्वांना स्मारकविधीच्या आमंत्रण पत्रिकेची एक प्रत द्या आणि त्यातील माहितीवर चर्चा करा. पान क्र. ४ वर असलेल्या नमुना सादरीकरणाचा उपयोग करून एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ३० आणि प्रार्थना