लवकरात लवकर निघा
आपण क्षेत्र सेवेसाठी एकत्र जमतो तेव्हा बांधवांबरोबर साहजिकच आपल्या गप्पा रंगतात. पण, जोड्या लावल्यावर आपण लगेच तिथून निघालं पाहिजे. कारण आपलं प्रचाराचं कार्य हे जास्त महत्त्वाचं काम आहे. (२ तीम. ४:२) आपला बहुतेक वेळ गप्पा-टप्पा मारण्यात गेला तर सेवेसाठी आपल्याकडं जास्त वेळ उरणार नाही. सेवेत बांधवांबरोबर एकत्र काम करताना आपल्याला त्यांच्यासोबत संगती करण्यासाठी भरपूर वेळ असेल. लवकरात लवकर सेवा सुरू करून आपण दाखवून देऊ की आपण यहोवाची व त्याचा पुत्र येशू याची सेवा करणारे मेहनती सेवक आहोत.—रोम. १२:११.