जानेवारी २६ च्या सप्ताहाचा आराखडा
२६ जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३८ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ३४ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते ५-७ (८ मि.)
क्र. १: शास्ते ७:१२-२५ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: अम्नोन—विषय: वासनायुक्त प्रेम घातक ठरू शकते—२शमु १३:१-२९ (५ मि.)
क्र. ३: यहोवाविषयी शिकण्याचे मार्ग—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. ५ परि. १-४ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: नम्रतेने प्रभूची सेवा करा.—प्रेषितांची कृत्ये २०:१९.
१५ मि: जानेवारी व फेब्रुवारी महिन्यादरम्यान आपली साहित्य सादरता. चर्चा. आनंदाची बातमी माहितीपत्रक देताना आलेले अनुभव सांगण्यास श्रोत्यांना उत्तेजन द्या. हे माहितीपत्रक कसं देता येईल त्याचं एक संक्षिप्त प्रात्यक्षिक दाखवा. नंतर, “लवकरात लवकर निघा” या लेखाची चर्चा करा.
१५ मि: प्रभूची सेवा करणारे वडील—टेहळणी बुरूज अभ्यास संचालक. टेहळणी बुरूज अभ्यास संचालकांची मुलाखत घ्या. त्यांना विचारा: ही जबाबदारी सांभाळण्यात काय गोवलेलं आहे? टेहळणी बुरूज अभ्यासाची तुम्ही तयारी कशी करता? उत्तर देण्यासाठी हात वर करणाऱ्या सर्वांनाच का विचारू शकत नाही? हा अभ्यास फायदेकारक व आनंददायक व्हावा म्हणून टेहळणी बुरूज अभ्यास लेखाचे वाचन करणारा बांधव, उत्तर देणारे बंधुभगिनी व माईक फिरवणारे बांधव हे सर्व आपापल्या परीने काय करू शकतात?
गीत २४ आणि प्रार्थना