सेवा कार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—चिडलेल्या घरमालकाबरोबर शांतीनं वागा
हे का महत्त्वाचं: आपल्याला सेवेत भेटणारे बहुतेक लोक आपल्याशी आदरानंच बोलतात. पण काही लोक आपल्यावर चिडतील असं येशूनं आधीच सांगितलं होतं. (योहा. १७:१४) घरमालक आपल्यावर चिडला तर आपण आश्चर्य वाटून घेऊ नये. अशा परिस्थितीत यहोवाला आवडेल अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. (रोम. १२:१७-२१; १ पेत्र ३:१५) यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. शिवाय, त्या घरमालकाला आणि आपल्याकडं पाहणाऱ्या इतर लोकांना आपल्याबद्दल साक्ष मिळेल. पुढच्या वेळी त्यांच्याकडे जर कोणी यहोवाचे साक्षीदार गेलेच तर ते त्यांचं बोलणं कदाचित ऐकून घेतील.—२ करिंथ. ६:३.
या महिन्यादरम्यान हे करून पाहा:
तुमच्या कौटुंबिक उपासनेच्या वेळी या विषयाचा सराव करा.
चिडलेल्या घरमालकाच्या घरून निघाल्यावर, तुमच्या सोबत असलेल्या बांधवाबरोबर किंवा बहिणीबरोबर, तुम्ही ही परिस्थिती आणखी चांगल्या प्रकारे कशी हाताळू शकला असता याची चर्चा करा.