जानेवारी १९ च्या सप्ताहाचा आराखडा
१९ जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २३ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ३३ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: शास्ते १-४ (८ मि.)
क्र. १: शास्ते ३:१-११ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: तुम्ही देवाबद्दलची माहिती कशी मिळवू शकता?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. ४ परि. १-४ (५ मि.)
क्र. ३: अहीथोफेल—विषय: विश्वासघातक्यांनी रचलेले कट यहोवा उधळून लावतो—२शमु १५:१२, ३१-३४; १६:१५, २१, २३; १७:१-१४, २३ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: नम्रतेने प्रभूची सेवा करा.—प्रेषितांची कृत्ये २०:१९.
१५ मि: देवाच्या वचनात परिवर्तन करण्याची शक्ती आहे. टेहळणी बुरूज १५ नोव्हेंबर २००३, पृ. ११ परि. १३-१७ वर आधारित भाषण. बायबलमधील सल्ल्यामुळे लोक आपल्या जीवनात बदल कसे करू शकले याबद्दलचे अनुभव सांगा. सेवेत नेहमी बायबलचा सुज्ञपणे उपयोग करण्याचे सर्वांना उत्तेजन द्या.
१५ मि: “सेवकांनो प्रगती करत राहा!” प्रश्न व उत्तरे.
गीत २० आणि प्रार्थना