डिसेंबर २९ च्या सप्ताहाचा आराखडा
२९ डिसेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १६ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा २९ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: यहोशवा १२-१५ (१० मि.)
ईश्वरशासित प्रशाला उजळणी (२० मि.)
❑ सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: आपल्याला दिलेल्या चांगल्या भांडारातून “चांगल्या गोष्टी” काढा.—मत्त. १२:३५क, पं.र.भा.
२० मि: बायबल विद्यार्थ्यांना व आपल्या मुलांना प्रगती करायला मदत करण्यासाठी त्यांना “चांगल्या गोष्टी” शिकवा (मत्त. १२:३५क, पं.र.भा.). चर्चा. बायबल विद्यार्थ्यांना आणि आपल्या मुलांना आपण सत्य शिकवत असतो तेव्हा त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करत असतो ते दाखवण्यासाठी १ करिंथकर १३:११ या वचनाचा उपयोग करा. मार्क ४:२८ मधील तत्त्व समजावून सांगा. (टेहळणी बुरूज१४ १२/१५ पृ. १२ परि. ६-८ पाहा.) एका अनुभवी प्रचारकाची किंवा पालकाची मुलाखत घ्या. त्यांना विचारा, की त्यांनी एखाद्या बायबल विद्यार्थ्याला किंवा आपल्या मुलाला आध्यात्मिक प्रगती करायला कशी मदत केली.—इफिस. ४:१३-१५; आपली राज्य सेवा ५/१४ ‘प्रश्न पेटी’ पाहा.
१० मि: “पाहुणचार करण्याद्वारे इतरांना ‘चांगल्या गोष्टी’ द्या (मत्त. १२:३५क, पं.र.भा.).” चर्चा. पाहुणचार दाखवल्यामुळे काहींना कोणते फायदे झाले किंवा कोणते आनंददायक अनुभव आले आहेत? इतरांना व खासकरून पूर्ण वेळच्या सेवेत असलेल्यांना आपण पाहुणचार कसा दाखवू शकतो, ते श्रोत्यांना विचारा. मंडळीत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्या वक्त्याच्या भोजनाची काय व्यवस्था केली जाते ते सांगा.
गीत ५० आणि प्रार्थना