वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/१४ पृ. ६-७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१४
आमची राज्य सेवा—२०१४
km १२/१४ पृ. ६-७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२९ डिसेंबर २०१४ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल.

१. मृत व्यक्‍तीबद्दल शोक करत असताना स्वतःच्या अंगावर वार करून घेण्यास अनुवाद १४:१ मधील आज्ञा कशा प्रकारे प्रतिबंध करते? [नोव्हें. ३, टेहळणी बुरूज ०४ ९/१५ पृष्ठ २७ परि. ४]

२. इस्राएलच्या राजांनी देवाच्या नियमशास्त्राची एका वहीत नक्कल करून जन्मभर त्याचे अध्ययन करण्यामागे काय उद्देश होता? (अनु. १७:१८-२०) [नोव्हें. ३, टेहळणी बुरूज ०२ ६/१५ पृष्ठ १२ परि. ४]

३. “बैल व गाढव ह्‍यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको,” असे का म्हटले आहे व अशी विजोड जोडी न करण्याची आज्ञा ख्रिश्‍चनांना कशी लागू होते? (अनु. २२:१०) [नोव्हें. १०, टेहळणी बुरूज ०३ १०/१५ पृष्ठ ३२]

४. जाते किंवा जात्याची वरची तळी गहाण ठेवून घेण्यास मनाई का होती? (अनु. २४:६) [नोव्हें. १७, टेहळणी बुरूज ०४ ९/१५ पृष्ठ २६ परि. ३]

५. इस्राएल लोकांनी कोणत्या मनोवृत्तीने देवाच्या आज्ञांचे पालन करायचे होते आणि कोणत्या गोष्टीने प्रेरित होऊन आपण यहोवाची सेवा केली पाहिजे? (अनु. २८:४७) [नोव्हें. २४, टेहळणी बुरूज १० ९/१५ पृष्ठ ८ परि. ४]

६. जीवन प्राप्त करण्याकरता कोणत्या तीन मूलभूत गोष्टी अनुवाद ३०:१९, २० मध्ये सांगितल्या आहेत? [नोव्हें. २४, टेहळणी बुरूज १० २/१५ पृष्ठ २८ परि. १७]

७. बायबल वाचन करताना आपण उत्पत्ति ते प्रकटीकरण पुस्तकांतील एकेक शब्द अक्षरशः तोंडाने उच्चारला पाहिजे का? (यहो. १:८) [डिसें. ८, टेहळणी बुरूज १३ ४/१५ पृष्ठ ७ परि. ४]

८. यहोशवा ५:१४, १५ मधील “परमेश्‍वराचा सेनापती” कोण आहे आणि या अहवालावरून आपल्याला उत्तेजन कसे मिळू शकते? [डिसें. ८, टेहळणी बुरूज ०४ १२/१ पृष्ठ ९ परि. १]

९. कोणत्या कारणामुळे आखानाने पाप केले आणि त्याच्या वाईट उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो? (यहो. ७:२०, २१) [डिसें. १५, टेहळणी बुरूज १० ४/१५ पृष्ठे २०-२१ परि. २, ५]

१०. कालेबच्या उदाहरणावरून आज आपल्याला कोणते उत्तेजन मिळते? (यहो. १४:१०-१३) [डिसें. २९, टेहळणी बुरूज ०४ १२/१ पृष्ठ १२ परि. २]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा