वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१४ पृ. ७
  • नवीन संशोधन साधन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन संशोधन साधन
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • राज्य सभागृहातील ग्रंथालयाचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • इंडेक्सच्या साहाय्याने आपले राज्याचे उपाध्यपण पूर्ण करणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • संशोधनासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km ११/१४ पृ. ७

नवीन संशोधन साधन

आजवर लाखो प्रचारक, संस्थेच्या प्रकाशनांमध्ये संशोधन करण्यासाठी वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स याचा चांगला उपयोग करत आले आहेत. पण हे इंडेक्स अतिशय सविस्तर असल्यामुळे ते फक्‍त काही भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक हे नवीन साधन १७० भाषांमध्ये तसेच, अमेरिकन संकेत भाषा, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्‍नड, मराठी, मल्याळम, नेपाळी, पंजाबी, तमीळ व तेलगू या भाषांमध्येही तयार करण्यात आले आहे. संशोधन मार्गदर्शक यात प्रामुख्याने २००० सालापासूनच्या प्रकाशनांचा संदर्भ देण्यात आला आहे. ज्या भाषांमध्ये इंडेक्स आहे त्या भाषांमध्ये संशोधन मार्गदर्शक छापण्यात आलेले नाही. पण, वॉचटावर लायब्ररी व वॉचटावर—ऑनलाईन लायब्ररीच्या इलेक्ट्रॉनिक फॉरमॅटमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. संशोधन मार्गदर्शकामुळे तुम्ही बायबल प्रश्‍नांची उत्तरे शोधू शकता व तुम्हाला वैयक्‍तिक रीत्या काही प्रश्‍न असतील तर त्यांबद्दलची माहितीही मिळवू शकता. इतकेच नव्हे तर तुम्ही सभांची व कौटुंबिक उपासनेचीदेखील तयारी करू शकता.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा