जून ९ च्या सप्ताहाचा आराखडा
९ जून पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ३१ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
यहोवाची इच्छा पृ. ३ आणि पाठ १-२ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: लेवीय १-५ (१० मि.)
क्र. १: लेवीय ४:१६-३१ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: मृतांची परिस्थिती—बायबल विषय २७ख (५ मि.)
क्र. ३: अबशालोम—सौंदर्य, गर्व व फसवेगिरी यांमुळे नको त्या घटना घडतात—२ शमु १३:१-३८; १४:२५-२७ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: तुम्ही कधी यांचा वापर केला आहे का? चर्चा. भाषणाद्वारे अलीकडील आपली राज्य सेवा अंकांत आलेल्या: “बायबल काय शिकवते पुस्तकातून एखादी व्यक्ती अभ्यास करायला तयार नसल्यास . . . ” (आपली राज्य सेवा १२/१३), आणि “नियतकालिक मार्ग—बायबल अभ्यास सुरू करण्यास उपयुक्त” (आपली राज्य सेवा १/१४), या लेखांबद्दल थोडक्यात सांगा. या लेखांत दिलेल्या सूचना वापरात आणल्याने काय फायदा झाला ते श्रोत्यांना विचारा.
२० मि: “ऐतिहासिक कामगिरीचा ऑगस्ट महिना!” सेवा पर्यवेक्षकाद्वारे प्रश्न व उत्तरे. जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल? या नवीन पत्रिकेची एकेक प्रत श्रोत्यांना वाटा आणि त्यात कोणते मुद्दे सांगण्यात आले आहेत त्यावर चर्चा करा. क्षेत्र पूर्ण करण्यासाठी मंडळीने कोणत्या योजना केल्या आहेत ते सांगा.
गीत १६ आणि प्रार्थना