जानेवारी ६ च्या सप्ताहाचा आराखडा
२०१४, ६ जानेवारी पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ११ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबलचा संदेश अध्या. ५ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति १-५ (१० मि.)
क्र. १: उत्पत्ति ४:१-१६ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: पूर्वजांची भक्ती करणे व्यर्थ आहे—बायबल विषय १ए (५ मि.)
क्र. ३: अहरोन—ख्रिश्चनांसाठी उत्तम उदाहरण कसे मांडले?—निर्ग ४:१४-१६, २७-३०; ७:९-१२, १९, २०; १७:९, १२; ३२:२६-३० (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: जानेवारी महिन्यात नियतकालिक सादर करण्यासाठी विविध कल्पना. चर्चा. तुमच्या क्षेत्रातील लोकांना जानेवारी – मार्च टेहळणी बुरूज नियतकालिक वाचायला का आवडेल ते एका मिनिटाच्या आत सांगा. मग मुख्य विषयाचा उपयोग करून, घरमालकाची आवड वाढवण्यासाठी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो ते श्रोत्यांना विचारा. त्यानंतर कोणते शास्त्रवचन वाचले जाऊ शकते ते विचारा. नियतकालिक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: मंडळीच्या गरजा.
१० मि: आपण काय शिकतो? चर्चा. १ करिंथकर ९:१९-२३ श्रोत्यांकडून वाचून घ्या. ही वचने क्षेत्र सेवेत आपल्याला कशी उपयोगी ठरू शकतात यावर चर्चा करा.
गीत ७ आणि प्रार्थना