सप्टेंबर ९ च्या सप्ताहाचा आराखडा
९ सप्टेंबर पासून सुरू होणारा सप्ताह
गीत ५२ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १६ परि. १-८ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ करिंथकर १०-१६ (१० मि.)
क्र. १: १ करिंथकर १४:७-२५ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: एक पापी व्यक्ती यहोवाला शरण कशी जाऊ शकते?—२ इति. ३३:१२, १३; यश. ५५:६, ७ (५ मि.)
क्र. ३: एक सुंदर बाग—बायबल कथा २ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१५ मि: आनंदाची बातमी! हे माहितीपत्रक सादर केल्याने मिळालेले अनुभव. चर्चा. श्रोत्यांना विचारा, की बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आनंदाची बातमी! या माहितीपत्रकाचा उपयोग केल्याने त्यांना कोणते चांगले अनुभव मिळाले आहेत. एखाद्याने आपले नियतकालिक स्वीकारले आहे आणि त्याची पुनर्भेट घेताना आनंदाची बातमी! हे माहितीपत्रक कसे सादर केले जाऊ शकते त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवा.—आपली राज्य सेवा, मार्च २०१३ पृष्ठ ७ पाहा.
१५ मि: “संदेष्ट्यांचे अनुकरण करा—आमोस.” प्रश्न व उत्तरे.
गीत ४४ आणि प्रार्थना