संदेष्ट्यांचे अनुकरण करा—योएल
१. इतरांना संदेश सांगताना आपण योएलच्या नम्रतेचे अनुकरण कसे करू शकतो?
१ संदेष्टा योएल कोण होता? त्याने स्वतःबद्दल फक्त इतकेच सांगितले की तो “पथूएलाचा पुत्र” होता. (योए. १:१) या नम्र संदेष्ट्याने संदेशवाहक या नात्याने स्वतःच्या भूमिकेवर नव्हे, तर यहोवाच्या संदेशावर भर दिला. त्याचप्रमाणे, आज सेवाकार्यात लोकांकडून स्तुती मिळवण्याऐवजी किंवा आपल्याकडे त्यांचे लक्ष वेधण्याऐवजी आपण यहोवाकडे आणि बायबलकडे त्यांचे लक्ष वेधले पाहिजे. (१ करिंथ. ९:१६; २ करिंथ. ३:५) तसेच, आपण सांगत असलेल्या संदेशामुळे आपल्याला शक्ती मिळते. योएलच्या भविष्यवाणीतील कोणत्या गोष्टी आज आपल्यात उत्साह आणि आशा निर्माण करू शकतात?
२. जगाचा अंत किती जवळ आहे याचा आपण विचार करतो तेव्हा काय करण्यास आपण प्रवृत्त होतो?
२ “परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे.” (योए. १:१५): हे शब्द जरी हजारो वर्षांआधी लिहिण्यात आले असले तरी आज आपल्या काळात ते पूर्ण होत आहेत. जगाची खालावत चाललेली परिस्थिती आणि क्षेत्रात तोंड द्याव्या लागणाऱ्या लोकांच्या थट्टेखोर व बेपर्वा वृत्तीवरून स्पष्ट दिसून येते की या दुष्ट जगाचा अंत जवळ आला आहे. (२ तीम. ३:१-५; २ पेत्र ३:३, ४) या जगाचा अंत किती जवळ आहे याचा आपण विचार करतो तेव्हा आपण यहोवाच्या सेवेला जीवनात पहिले स्थान देण्यास प्रवृत्त होतो.—२ पेत्र ३:११, १२.
३. मोठे संकट जवळ येत असता सेवाकार्य करणे इतके महत्त्वाचे का आहे?
३ “परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे.” (योए. ३:१६): या वचनात सांगितलेले ‘थरथर कापणे’ हे मोठ्या संकटादरम्यान होणाऱ्या यहोवाच्या न्यायदंडाला सूचित करते. पण, त्या वेळी यहोवा त्याच्या विश्वासू सेवकांना त्यातून वाचवेल हे सांत्वन आपल्याला मिळते. (प्रकटी. ७:९, १४) आपण प्रचार कार्यात सहभाग घेतो आणि यहोवा कशा प्रकारे आपल्याला सांभाळतो व शक्ती देतो हे अनुभवतो तेव्हा आपला विश्वास आणि धीर वाढतो. हीच गोष्ट येणाऱ्या मोठ्या संकटादरम्यान आपल्याला मदत करेल.
४. आपण आनंदी का असू शकतो आणि भविष्याकडे आत्मविश्वासाने का पाहू शकतो?
४ काही लोकांना योएलचा संदेश निराशाजनक वाटतो, पण देवाच्या लोकांना मात्र हा संदेश सुटकेची वैभवशाली आशा देतो. (योए. २:३२) त्यामुळे आपण भविष्याकडे आत्मविश्वासाने पाहू या आणि आवेशाने देवाच्या राज्याची सुवार्ता सांगू या. असे करत असताना योएल २:२३ मध्ये जे सांगण्यात आले आहे त्याप्रमाणे आपण करू या ज्यात म्हटले आहे: “परमेश्वर तुमचा देव याच्या ठायी उल्लास करा; हर्ष करा.”