जुलै १५ च्या सप्ताहाचा आराखडा
१५ जुलै पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १२ आणि प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल काय शिकवते अध्या. १३ परि. १-९ (३० मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: प्रेषितांची कृत्ये १८-२१ (१० मि.)
क्र. १: प्रेषितांची कृत्ये २०:१७-३८ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: प्रेषित निर्भयतेने प्रचार करतात— बायबलचा संदेश पृ. २५ (५ मि.)
क्र. ३: आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो?—रोम. ८:६ (५ मि.)
❑ सेवा सभा:
१० मि: सुवार्तेचा प्रचार करण्याच्या पद्धती—आस्थेवाईक लोकांचे लक्ष यहोवाच्या संघटनेकडे वेधणे. यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संघठित या पुस्तकातील पृष्ठ ९९, परिच्छेद २ ते ९ वर आधारित भाषण. आपल्या बायबल विद्यार्थ्यांचे लक्ष संघटनेकडे वेधण्यासाठी श्रोत्यांनी यहोवाची इच्छा माहितीपत्रकाचा उपयोग कसा केला ते त्यांना विचारा.
१० मि: जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद यहोवा तुम्हाकरता वर्षितो की नाही याविषयी त्याची प्रतीती पाहा. (मला. ३:१०) दोन किंवा तीन सामान्य पायनियरांची मुलाखत घ्या. पायनियरिंगबद्दल कोणती गोष्ट त्यांना सगळ्यात जास्त आवडते? पायनियरिंग केल्यामुळे त्यांना यहोवाच्या जवळ जाण्यास कशी मदत मिळाली? त्यांना आलेले उल्लेखनीय अनुभव विचारा. प्रचारकांना सप्टेंबर महिन्यात सामान्य पायनियर बनण्याचे प्रोत्साहन देऊन समारोप करा.
१० मि: “संदेष्ट्यांचे अनुकरण करा—योएल.” प्रश्न आणि उत्तरे.
गीत ५४ आणि प्रार्थना