एकाच विषयावर बोला
आपल्या टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रत्येक सार्वजनिक अंकात बरेच रोचक विषय असतात. घरमालकाशी बोलताना नियतकालिकातील प्रत्येक विषयावर बोलण्याऐवजी कोणत्यातरी एकाच विषयावर बोलणे सहसा चांगले राहील. आपण जर घरमालकाच्या घरातील परिस्थितीचे चांगले निरीक्षण केले आणि नियतकालिकात कोणकोणते विषय आहेत हे आधीच पाहिले तर घरमालकाला आवडतील असे विषय आपण त्याला दाखवू शकू. उदाहरणार्थ, घरात जर आपण लहान मुलांची खेळणी पाहिली असेल तर नियतकालिकातील कौटुंबिक जीवनावर आधारित लेख घरमालकाला दाखवू शकतो. जर घरमालक पुरूष असेल तर पुरुषांना सहसा आवडणाऱ्या विषयांवर असलेला लेख आपण त्याला दाखवू शकतो; यांपैकी एक विषय, चांगले सरकार हा असू शकतो.