वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१३ पृ. ३
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२०१३
आमची राज्य सेवा—२०१३
km ६/१३ पृ. ३

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

२४ जून २०१३ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्‌यावर कधी चर्चा करण्यात आली त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.

१. कोणते मंदिर बांधायला “शेचाळीस वर्षे” लागली? (योहा. २:२०) [मे ६, टेहळणी बुरूज ०८ ४/१५ पृष्ठ ३० परि. ६]

२. ‘एखाद्याठायी जीवन असण्याचा’ काय अर्थ होतो? (योहा. ५:२६; ६:५३) [मे १३, टेहळणी बुरूज ०८ ४/१५ पृष्ठ ३१ परि. १]

३. येशूने अपरिपूर्ण मानवांसमोर आपल्या पित्याला कसे प्रकट केले? (योहा. ८:२८) [मे २०, टेहळणी बुरूज १२ ४/१५ पृष्ठ ५ परि. ९, १०]

४. आपला प्रिय मित्र लाजर याच्या मृत्यूच्या वेळी “येशू रडला” या घटनेवरून आपण काय शिकतो? (योहा. ११:३५) [मे २०, टेहळणी बुरूज १२ ४/१५ पृष्ठ ५ परि. १०]

५. येशू कशा प्रकारे आपल्या विश्‍वासू अनुयायांकरता स्वर्गात “जागा तयार” करणार होता? (योहा. १४:२) [मे २७, टेहळणी बुरूज ०८ ४/१५ पृष्ठ ३२ परि. ३]

६. देवाचा आत्मा आपले मार्गदर्शन कसे करू शकतो? (योहा. १४:२६) [मे २७, टेहळणी बुरूज ११ १२/१५ पृष्ठे १४-१५ परि. ९]

७. योहान २१:१५ मध्ये “ह्‍यांच्यापेक्षा” असे जे म्हटले आहे ते कोणाविषयी म्हटले आहे, आणि त्यावरून आपण कोणता धडा शिकू शकतो? [जून ३, टेहळणी बुरूज ०८ ४/१५ पृष्ठ ३२ परि. ११]

८. प्रेषितांची कृत्ये २:४४-४७ आणि प्रेषितांची कृत्ये ४: ३४, ३५ मध्ये सांगितल्याप्रमाणे ख्रिश्‍चनांनी कोणत्या मनोवृत्तीचे अनुकरण केले पाहिजे? [जून १०, टेहळणी बुरूज ०८ ५/१५ पृष्ठ ३० परि. ५]

९. प्रेषितांची कृत्ये ७:५९ मध्ये सांगितल्याप्रमाणे स्तेफन येशूला प्रार्थना करत होता का? [जून १७, टेहळणी बुरूज ०८ ५/१५ पृष्ठ ३१ परि. २]

१०. प्रेषितांची कृत्ये ९:२८-३० यातून आपण कोणता बोध घेऊ शकतो? [जून २४, टेहळणी बुरूज ०८ ५/१५ पृष्ठ ३१ परि. ६]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा