वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/१२ पृ. १
  • परिणामकारक ठरेल अशी पद्धत वापरा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • परिणामकारक ठरेल अशी पद्धत वापरा
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • ‘माझ्या वचनात राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “लोकांच्या आवडीनुसार एखादे जुने नियतकालिक किंवा माहितीपत्रक द्या”
    आमची राज्य सेवा—२०११
  • सर्व प्रकारच्या लोकांना सुवार्ता सांगा
    आमची राज्य सेवा—२०१२
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ९/१२ पृ. १

परिणामकारक ठरेल अशी पद्धत वापरा

१. सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी लोकांशी बोलताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला त्यावरून आपण काय शिकतो?

१ सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांनी वेगवेगळ्या संस्कृतीच्या आणि धर्माच्या लोकांना सुवार्ता सांगितली. (कलस्सै. १:२३) त्यांचा संदेश एकाच विषयाबद्दल अर्थात देवाच्या राज्याबद्दल होता, पण त्यांनी लोकांना लक्षात घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने सुवार्ता सांगितली. उदाहरणार्थ, शास्त्रवचनांबद्दल आदर असणाऱ्‍या यहूदी लोकांशी बोलताना पेत्राने योएल संदेष्ट्याचा उल्लेख केला. (प्रे. कृत्ये २:१४-१७) दुसरीकडे पाहता, ग्रीक लोकांशी बोलताना पौलाने कसा तर्कवाद केला ते प्रेषितांची कृत्ये १७:२२-३१ या वचनांतून दिसून येते. आज, आपल्या काही क्षेत्रांत लोक बायबलचा आदर करतात आणि त्यामुळे घरोघरचे कार्य करताना आपण सहजपणे बायबलचा उपयोग करू शकतो. पण, ज्यांना बायबलबद्दल किंवा धर्माबद्दल काहीच आस्था नाही किंवा जे ख्रिस्ती नाहीत अशा लोकांशी बोलताना आपण अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे.

२. ज्यांना बायबलबद्दल आस्था आहे किंवा ज्यांना बायबलबद्दल आस्था नाही अशा लोकांना मदत करण्यासाठी आपण आपल्या साहित्य सादरतेचा उपयोग कसा करू शकतो?

२ साहित्य सादरतेचा चांगल्या प्रकारे उपयोग करा: या सेवा वर्षातील साहित्य सादरतेत दर दोन महिन्यांनी बदल केला जाईल आणि त्यात नियतकालिके, पत्रिका, माहितीपत्रके यांचा समावेश केला जाईल. आणि यामुळे आपल्या क्षेत्रातील लोकांना जरी बायबलबद्दल आस्था नसेल तरी आपण त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांवर आधारित साहित्य देऊ शकू. आपण कदाचित पहिल्या भेटीत बायबलचे वचन वाचणार नाही किंवा बायबलचा उल्लेख करणार नाही, पण आवड दाखवणाऱ्‍या लोकांची पुनर्भेट घेताना आपण त्यांना सृष्टिकर्त्याबद्दल आणि त्याचे वचन बायबलबद्दल अधिक जाणून घेण्यास मदत करू शकतो. दुसरीकडे पाहता, ज्यांना बायबलबद्दल आस्था वाटते अशा लोकांना आपण बायबल आधारित साहित्ये देऊ शकतो. त्या महिन्याची साहित्य सादरता कोणतीही असली तरी अशा लोकांना आपण बायबल काय शिकवते किंवा देवाचे ऐका किंवा देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा ही माहितीपत्रके देऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिणामकारक ठरेल अशी पद्धत आपण वापरली पाहिजे.

३. आपल्या क्षेत्रातील लोकांच्या मनाची तुलना जमिनीशी कशी केली जाऊ शकते?

३ लोकांची मने तयार करा: एका व्यक्‍तीच्या मनाची तुलना जमिनीशी केली जाऊ शकते. (लूक ८:१५) सत्याचे बी पेरण्याआधी आणि ते वाढवण्याआधी काही लोकांची मने तयार करण्यासाठी कदाचित आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीतून आलेल्या लोकांच्या मनात यशस्वी रीत्या सत्याचे बी पेरले आणि यामुळे त्यांना आनंद व समाधान लाभले. (प्रे. कृत्ये १३:४८, ५२) आपणही परिणामकारक ठरेल अशा पद्धतींचा वापर केला तर आपल्यालाही आनंद व समाधान लाभेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा