ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
२५ जून २०१२ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्यावर कधी चर्चा केली जाईल त्याची तारीख देण्यात आली आहे. यामुळे दर आठवडी प्रशालेची तयारी करताना तुम्हाला त्यावर संशोधन करता येईल.
१. कठीण आर्थिक काळातही यिर्मयाचा निभाव लागला यावरून आपल्याला कोणती खातरी मिळते? (यिर्म. ३७:२१) [७ मे, टेहळणी बुरूज९७ ९/१५ पृ. ३ परि. ४-पृ. ४ परि. १]
२. बारूखला कोणत्या “मोठाल्या गोष्टींची” आकांक्षा होती, आणि यहोवाच्या सल्ल्याबद्दल त्याने दाखवलेली मनोवृत्ती आपले लक्ष कशावर केंद्रित करण्यास आपल्याला प्रेरित करते? (यिर्म. ४५:२-५) [२१ मे, टेहळणी बुरूज०८ १०/१५ पृ. ८ परि. ७; टेहळणी बुरूज०८ ४/१५ पृ. १५ परि. १६]
३. ईजिप्टच्या आवाजाची तुलना सर्पाशी का केली आहे? (यिर्म. ४६:२२) [२१ मे, टेहळणी बुरूज०७ ३/१५ पृ. ११ परि. ५]
४. बॅबिलोनमध्ये बंदिवासात असलेल्या यहुद्यांना यिर्मयाने सांगितलेल्या भविष्यसूचक संदेशावरून आपण काय शिकतो? (यिर्म. ५१:६, ४५, ५०) [४ जून, टेहळणी बुरूज०८ ६/१५ पृ. ८, ९ परि. ९, १०]
५. यहोवाने “यहूदाच्या कुंवार कन्येचा द्राक्षकुंड तुडवला आहे,” याचा काय अर्थ होतो? (विलाप. १:१५, NW) [११ जून, टेहळणी बुरूज०७ ६/०१ पृ. ८, परि. ६]
६. कशा प्रकारे इस्राएलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून देण्यात आले? (विलाप. २:१) [११ जून, टेहळणी बुरूज०७ ६/०१ पृ. ९, परि. १]
७. यहोवाचे पादासन आणि त्याचा “मांडव” कशास सूचित करतो? (विलाप. २:१, ६) [११ जून, टेहळणी बुरूज०७ ६/०१ पृ. ९, परि. २]
८. मनुष्याने आपल्या तारुण्यात दुःखाचे जू वाहावे हे त्याला बरे का आहे? (विलाप. ३:२७) [१८ जून, टेहळणी बुरूज०७ ६/०१ पृ. ११, परि. ३]
९. यहोवा लोकांना त्यांच्या पूर्वजांच्या पापांबद्दल जबाबदार ठरवतो का? (विलाप. ५:७) [१८ जून, टेहळणी बुरूज०७ ६/०१ पृ. १०, परि. ५]
१०. लोक आपल्या संदेशाकडे दुर्लक्ष करत असले तरीसुद्धा धैर्याने आपला संदेश सांगत राहण्यास यहेज्केलाचे उदाहरण आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकेल? (यहे. ३:८, ९) [२५ जून, टेहळणी बुरूज०८ ७/१५ पृ. ८-९, परि. ६-७]