प्रचार कार्य करण्याची बारा कारणे
आपण घरोघरचे प्रचार कार्य का करतो व लोकांना बायबलचे शिक्षण का देतो? केवळ प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना जीवनाच्या मार्गावर आणण्यासाठी आपण हे करतो का? (मत्त. ७:१४) अर्थात, खाली नमूद केलेल्या अनेक कारणांपैकी हे पहिले कारण असले, तरी केवळ तेच एक मुख्य कारण नाही. खाली सांगितलेल्या १२ कारणांपैकी कोणते कारण सगळ्यात महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटते?
१. त्यामुळे लोकांचे जीवन वाचते.—योहा. १७:३.
२. त्यामुळे दुष्ट लोकांना धोक्याचा इशारा दिला जातो.—यहे. ३:१८, १९.
३. त्यामुळे बायबलची भविष्यवाणी पूर्ण होते. —मत्त. २४:१४.
४. त्यामुळे देव किती नीतिमान आहे हे दिसून येते. यहोवाने दुष्ट लोकांना सुधारण्याची संधी न देताच त्यांचा नाश केला असा आरोप त्याच्यावर कोणीही लावू शकणार नाही.—प्रे. कृत्ये १७:३०, ३१; १ तीम. २:३, ४.
५. त्यामुळे ज्या लोकांना येशूच्या रक्ताद्वारे विकत घेण्यात आले आहे त्यांना आध्यात्मिक मदत करण्याचे आपले कर्तव्य आपण पूर्ण करू शकतो.—रोम. १:१४, १५.
६. त्यामुळे आपण रक्तदोषापासून मुक्त होतो. —प्रे. कृत्ये २०:२६, २७.
७. आपले तारण होण्यासाठी हे कार्य करणे आवश्यक आहे.—यहे. ३:१९; रोम. १०:९, १०.
८. त्यामुळे आपल्या शेजाऱ्यांवर आपले प्रेम असल्याचे दिसून येते.—मत्त. २२:३९.
९. त्यामुळे आपण यहोवाच्या व त्याच्या पुत्राच्या आज्ञांचे पालन करत असल्याचे दिसून येते. —मत्त. २८:१९, २०.
१०. ते आपल्या उपासनेचा एक भाग आहे.—इब्री १३:१५.
११. त्यामुळे देवावर आपले प्रेम असल्याचे दिसून येते.—१ योहा. ५:३.
१२. त्यामुळे यहोवाचे नाव पवित्र केले जाते. —यश. ४३:१०-१२; मत्त. ६:९.
अर्थात, सेवाकार्यात सहभाग घेण्याची केवळ हीच कारणे नाहीत, तर आणखीनही काही कारणे आहेत. उदाहरणार्थ, प्रचार कार्य केल्यामुळे देवावरील आपला विश्वास आणखी दृढ होतो आणि आपल्याला देवाचे सहकारी बनण्याचा बहुमान मिळतो. (१ करिंथ. ३:९) पण, वर दिलेल्या यादीतील बारावे कारण हे सेवाकार्यात सहभाग घेण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. क्षेत्रातील लोक आपले ऐकोत अगर न ऐकोत, आपल्या सेवाकार्यामुळे देवाचे नाव पवित्र केले जाते आणि यहोवाची निंदा करणाऱ्याला तो प्रत्युत्तर देतो. (नीति. २७:११) होय, लोकांना शिकवत राहण्याची व सुवार्ता गाजवत राहण्याची अनेक चांगली कारणे आपल्याजवळ आहेत.—प्रे. कृत्ये ५:४२.