आपल्या सेवाकार्याद्वारे यहोवाबद्दलचे प्रेम दाखवा
१. देवाबद्दल असलेल्या प्रेमाने येशूला काय करण्यास प्रेरित केले?
१ येशूने आपले सेवाकार्य प्रेमामुळे प्रेरित होऊन केले. येशूच्या सेवेचा प्रत्येक पैलू, त्याला यहोवाबद्दल असलेल्या प्रेमाचा नाकारता न येण्याजोगा पुरावा आहे. येशूने म्हटले: “मी पित्यावर प्रीति करितो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करितो, हे जगाने ओळखावे.” (योहा. १४:३१) येशूचे अनुकरण करणारे शिष्य या नात्याने आपल्यालाही देवाबद्दल असलेले गाढ प्रेम सेवाकार्याद्वारे दाखवण्याचा विशेषाधिकार मिळाला आहे.—मत्त. २२:३७; इफिस. ५:१, २.
२. यहोवाबद्दल आपल्याला असलेले प्रेम आपल्या सेवाकार्यातून कसे दिसून येते?
२ “तुझे नाव पवित्र मानिले जावो”: इतरांशी यहोवाबद्दल व त्याच्या राज्याबद्दल बोलण्याच्या प्रत्येक संधीचा आपण आवेशाने फायदा उचलतो तेव्हा आपण देवाबद्दल आपल्याला असलेले प्रेम दाखवत असतो आणि त्याचे नाव पवित्र होण्यास हातभार लावत असतो. (स्तो. ८३:१८; यहे. ३६:२३; मत्त. ६:९) येशूप्रमाणेच आपणही आपल्या सेवाकार्याद्वारे देवाचे नाव पवित्र व्हावे व त्याची इच्छा पूर्ण व्हावी असे आपल्याला मनापासून वाटत असल्याचे दाखवतो.—मत्त. २६:३९.
३. यहोवाबद्दलचे प्रेम आपल्याला अडथळे पार करायला कसे मदत करते?
३ अडथळे पार करायला प्रेम आपल्याला मदत करते: यहोवावर आपले प्रेम असेल तर आपण सर्व अडथळे पार करू शकतो. (१ करिंथ. १३:४, ७) येशूच्या जीवनात अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे तो आपली सेवा करण्यापासून परावृत्त होऊ शकला असता. परंतु यहोवावर त्याचे गाढ प्रेम होते व यहोवाची इच्छा पूर्ण करावी असे त्याला मनापासून वाटत असल्यामुळे तो सर्व अडथळे पार करू शकला. (मार्क ३:२१; १ पेत्र २:१८-२३) आपल्यावरही अनेक समस्या येतात पण देवावरील प्रेमामुळे आपण त्यांचा सामना करू शकतो. ख्रिस्ताच्या उदाहरणाचे जवळून अनुकरण केल्यास आपल्यालाही आपली सेवा धैर्याने पूर्ण करण्याचा आत्मविश्वास मिळेल. कुटुंबातील विरोध, आजारपण, म्हातारपण, क्षेत्र सेवेत लोक करत असलेला विरोध, आपल्या संदेशाप्रती लोकांची उदासीन मनोवृत्ती या सर्व गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो. पण यामुळे आपण यहोवाबद्दल आपल्याला असलेले प्रेम दाखवण्याचे व आपली सेवा शक्य तितक्या प्रभावीपणे करण्याचे थांबवत नाही.
४. आपल्याला कोणती कुवत मिळाली आहे?
४ प्रेमात ताकत असते. सेवेत देवावर आपले मनापासूनचे प्रेम दाखवण्याची कुवत आपल्याला मिळाली आहे. (१ करिंथ. १३:१३) यहोवाचे नाव कायमचे पवित्र केले जाईल तो काळ वेगाने जवळ येत असल्यामुळे आपल्यातील “प्रीति . . . उत्तरोत्तर अतिशय वाढावी,” अशी आमची प्रार्थना आहे.—फिलिप्पै. १:९; मत्त. २२:३६-३८.