वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/११ पृ. १
  • आपण क्षेत्र सेवेत धीर दाखवला पाहिजे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण क्षेत्र सेवेत धीर दाखवला पाहिजे
  • आमची राज्य सेवा—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • यहोवा आणि येशू यांच्या धीराचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • धीर दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तुम्हाला सहनशीलता बाळगता येईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०११
km ६/११ पृ. १

आपण क्षेत्र सेवेत धीर दाखवला पाहिजे

१. यहोवाने मानवजातीबद्दल धीर कसा दाखवला आहे?

१ देव मानवजातीबद्दल धीर दाखवत आला आहे. (निर्ग. ३४:६; स्तो. १०६:४१-४५; २ पेत्र ३:९) तो प्रेमळपणे धीर दाखवत आहे याचे एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आज जगभरात राज्य प्रचाराचे कार्य केले जात आहे. यहोवा जवळजवळ २,००० वर्षे मानवजातीबरोबर धीराने वागला आहे, आणि अजूनही तो प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना त्याच्यासोबत नातेसंबंध जोडण्याची संधी देत आहे. (योहा. ६:४४) आपण क्षेत्र सेवेत यहोवाच्या धीराचे अनुकरण कसे करू शकतो?

२. आपल्या क्षेत्रात सेवा कार्य करत असताना आपण धीर कसा दाखवू शकतो?

२ घरोघरचे सेवा कार्य: ज्या क्षेत्रात लोकांनी राज्य संदेशाप्रती अजूनही व्यक्‍तिगत रीत्या आवड दाखवलेली नाही अशांना साक्ष देण्याचे आपण ‘सोडत नाही,’ आणि असे करण्याद्वारे आपण यहोवाच्या धीराचे अनुकरण करतो. (प्रे. कृत्ये ५:४२) लोक आपल्याला थंड प्रतिसाद देतात, आपली थट्टा करतात व आपला विरोध करतात तेव्हा आपण धीराने त्याचा सामना करतो. (मार्क १३:१२, १३) आपल्याला घरोघरच्या प्रचार कार्यात आस्थेवाईक लोक भेटत नाहीत, तेव्हासुद्धा आपण चिकाटीने सत्याचे बी पेरण्याचा प्रयत्न करण्याद्वारे धीर दाखवतो.

३. पुनर्भेटी घेताना आणि बायबल अभ्यास चालवताना आपण धीर का दाखवला पाहिजे?

३ बायबल अभ्यास: एखादे रोपटे वाढवण्यासाठी धीराची गरज असते. आपण त्याचे संगोपन करू शकतो, पण आपण त्याला झटपट मोठे करू शकत नाही. (याको. ५:७) त्याच प्रकारे, आध्यात्मिक वाढ ही हळूहळू व टप्प्याटप्प्याने होत असते. (मार्क ४:२८) आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो त्यांना कदाचित खोट्या धर्माच्या शिकवणी किंवा बायबलच्या विरोधात असलेले रीतिरिवाज सोडून देणे कठीण जाऊ शकते. आपल्या बायबल विद्यार्थ्यांनी जीवनात बदल करावेत म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याद्वारे आपण झटपट आध्यात्मिक वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करू नये. बायबल विद्यार्थ्याच्या अंतःकरणावर देवाच्या पवित्र आत्म्याचा प्रभाव पडावा म्हणून पुरेपूर वेळ मिळण्यासाठी आपण धीर धरला पाहिजे.—१ करिंथ. ३:६, ७.

४. सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांना परिणामकारक रीत्या साक्ष देण्यासाठी धीर आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकते?

४ सत्यात नसलेले नातेवाईक: सत्यात नसलेल्या आपल्या नातेवाइकांनी सत्य शिकावे अशी आपली प्रबळ इच्छा असते. पण, आपल्या विश्‍वासांबद्दल त्यांना सांगण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहण्याद्वारे व त्यांच्यावर पुष्कळ माहितीचा मारा न करण्याद्वारे आपण धीर दाखवतो. (उप. ३:१, ७) यादरम्यान, आपण त्यांच्यासमोर आपल्या कृत्यांद्वारे चांगले उदाहरण मांडतो आणि सौम्यतेने व गहिऱ्‍या आदराने आपला विश्‍वास व्यक्‍त करण्यासाठी आपण तयार असतो. (१ पेत्र ३:१, १५) होय, आपण आपल्या सेवा कार्यात धीर दाखवतो तेव्हा आपले सेवा कार्य परिणामकारक बनेल व त्यामुळे आपल्या स्वर्गीय पित्याचे मन आनंदित होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा