जून २० च्या सप्ताहाचा आराखडा
२० जून ने सुरू होणारा सप्ताह
गीत ४३ व प्रार्थना
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. १७, १८ (२५ मि.)
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: स्तोत्रे ४५-५१ (१० मि.)
क्र. १: स्तोत्र ४८:१–४९:९ (४ मि. किंवा कमी)
क्र. २: अपाय होण्यापासून तुमच्या मुलाचे संरक्षण करा—कुटुंब पृष्ठे ६१, ६२ परि. २४-२६ (५ मि.)
क्र. ३: जीवन देवाकडून एक देणगी असल्यामुळे, आपण आपले तारण का साधून घेतले पाहिजे? —रोम. ६:२३; फिलिप्पै. २:१२ (५ मि.)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१५ मि: जुलै महिन्यात द्यावयाचे प्रकाशन. चर्चा. जुलै महिन्यात आपण जे साहित्य देणार आहोत त्याची काही वैशिष्ट्ये थोडक्यात सांगा. नंतर एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.
१५ मि: “बायबल अभ्यास सुरू करण्याकरता नवीन मालिका.” प्रश्न व उत्तरे. चर्चा सुरू करण्याआधी, ज्यांनी जुलै - सप्टेंबर २०११ चा टेहळणी बुरूज अंक आणला नसेल त्यांना एक-एक प्रत द्या. आणि शेवटी “देवाच्या वचनातून शिका—देवाकडून का शिकावे?” या लेखाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा सुरू करावा याची एक किंवा दोन प्रात्यक्षिके दाखवा.
गीत १७ व प्रार्थना