मे २४ च्या सप्ताहाचा आराखडा
मे २४ ने सुरू होणारा सप्ताह
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
lv अध्या. ७ परि. १०-१९, पृ. ९३ वरील चौकोन.
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: २ शमुवेल १३-१५
क्र. १: २ शमुवेल १३:२३-३३
क्र. २: कुटुंब काय करू शकते? (उर्वरित भाग) (fy पृ. १४५, १४६ परि. ९-१३)
क्र. ३: या जगाचा आपण पूर्णपणे उपयोग का करू नये (१ करिंथ. ७:३१)
❑ सेवा सभा:
५ मि: घोषणा.
१० मि: एप्रिल - जून टेहळणी बुरूज अंकाच्या सादरीकरणाची तयारी. श्रोत्यांसोबत चर्चा. नियतकालिकात काय दिले आहे त्याची एक दोन मिनिटात उजळणी करा. नंतर त्यातील दोन किंवा तीन लेख निवडून श्रोत्यांना विचारा की ते कोणत्या प्रश्नांचा व वचनांचा वापर करून आपली सादरता तयार करतील. नियतकालिक कसे सादर करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: स्वच्छ राज्य सभागृहामुळे यहोवाचा आदर होतो. वडिलांचे भाषण. यहोवा पवित्र देव असल्यामुळे, शारीरिक स्वच्छतेला त्याच्या लोकांनी खूप महत्त्व दिले पाहिजे. (निर्ग. ३०:१७-२१; ४०:३०-३२) आपल्या उपासनेचे ठिकाण स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याद्वारे आपण यहोवाचा गौरव करतो. (१ पेत्र २:१२) स्थानिक राज्य सभागृहात, स्वच्छता आणि दुरुस्तीची व्यवस्था पाहणाऱ्या बांधवाची मुलाखत घ्या. सुस्थितीत असलेल्या राज्य सभागृहामुळे आजूबाजूच्या लोकांना उत्तम साक्ष कशी मिळाली त्या संबंधाने असलेले स्थानिक किंवा प्रकाशनांत छापून आलेले अनुभव सांगा. राज्य सभागृह आणि त्याच्या बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवण्यात भाग घेण्यास सर्वांना उत्तेजन द्या.
१० मि: “राज्याची ही सुवार्ता गाजवली जाईल!” प्रश्नोत्तराने चर्चा.