जुलै २७ च्या सप्ताहाचा आराखडा
जुलै २७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत १० (८२)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ८५
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना १-३
क्र. १: गणना ३:१-२०
क्र. २: सौम्यपणा दाखवण्यासाठी आत्म-संयमाची गरज का आहे?
क्र. ३: कशाचे दळणवळण करावे? (fy-MR पृ. ६७, ६८ परि. ८-११)
❑ सेवा सभा:
गीत २१ (१९१)
५ मि: घोषणा.
१० मि: प्रश्नांचा प्रभावीपणे उपयोग करणे. सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पान २३६ ते २३७, परिच्छेद २ पर्यंतच्या माहितीवर आधारित श्रोत्यांबरोबर चर्चा. माहितीच्या आधारावर एक अथवा दोन मुद्द्यांचे थोडक्यात प्रात्यक्षिक दाखवा.
१० मि: दोन अथवा तीन आदर्श पालकांची मुलाखत घ्या. कुटुंब मिळून क्षेत्र सेवेत जाताना त्यांच्यासमोर येणाऱ्या समस्यांवर ते कशा प्रकारे मात करतात? आपल्या मुलांना क्षेत्र सेवेत अर्थपूर्ण भाग घेण्यास मदत करण्याकरता त्यांनी कोणती पावले उचलली आहेत? याविषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी कौटुंबिक उपासनेसाठी असलेल्या वेळेचा कशा प्रकारे उपयोग केला आहे?
१० मि: “दररोज यहोवाची स्तुती करा.” प्रश्न आणि उत्तराने चर्चा.
गीत १ (१३)