फेब्रुवारी १६ च्या सप्ताहाचा आराखडा
फेब्रुवारी १६ ने सुरु होणारा सप्ताह
गीत १६ (१४३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ५७, ५८
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: उत्पत्ति २९-३१
क्र. १: उत्पत्ति २९:१-२०
क्र. २: आपण “चिंता” का करू नये? (मत्त. ६:२५)
क्र. ३: आगाऊ शोध घ्या (fy-MR पृ. २२, २३ परि.१६-१९)
❑ सेवा सभा:
गीत ४ (४३)
५ मि.: घोषणा.
१५ मि.: ‘सर्व काही सुवार्तेकरिता करा.’ प्रश्नोत्तराने चर्चा.
१५ मि.: स्मारकविधीच्या काळात तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करायला जमेल का? सेवा पर्यवेक्षकांचे उत्तेजनात्मक भाषण. साहाय्यक पायनियर होण्यासाठी कोणकोणत्या अटी आहेत ते सांगा. साहाय्यक पायनियरींग केल्यामुळे मिळणारा आनंद व आशीर्वाद यांविषयी सांगा. मार्च, एप्रिल व मे या महिन्यांदरम्यान, मंडळीने केलेल्या क्षेत्र सेवा सभांच्या योजनांविषयी सांगा. गेल्या वर्षी, साहाय्यक पायनियरींग केलेल्या दोन अथवा तीन प्रचारकांची मुलाखत घ्या. साहाय्यक पायनियरींग करण्याकरता त्यांनी आपल्या आराखड्यात कोणते बदल केले? त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले? स्मारक विधीच्या काळात कुटुंबातील एक अथवा अधिक सदस्यांना साहाय्यक पायनियरींग कसे करता येऊ शकेल, यावर प्रत्येक कुटुंबाला चर्चा करण्याचे उत्तेजन द्या.
गीत १८ (१६२)