नियतकालिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज ऑक्टो. – डिसें.
“जीवनात जेव्हा काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात तेव्हा विश्वसनीय सल्ला तुम्हाला कोठून मिळू शकतो? [उत्तर ऐका आणि मग घरमालकाची संमती असेल तरच नीतिसूत्रे ३:५, ६ वाचा.] देवाच्या वचनात म्हटले आहे, की कोणताही निर्णय घेण्याआधी त्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करणे फायदेशीर आहे. या विषयीची अधिक माहिती या लेखात देण्यात आली आहे.” पृष्ठ २८ वरील लेख दाखवा.
टेहळणी बुरूज जाने. – मार्च
“प्रेमळ देवाची शिकवण आणि अनंतकाळ यातनेची शिकवण या दोन गोष्टी पुष्कळ लोकांना परस्परविरोधी वाटतात. तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐकून घ्या.] देव कोणाबरोबरही द्वेषबुद्धीने किंवा सूडबुद्धीने वागत नाही, असे शास्त्रवचनांमध्ये सांगितले आहे. [घरमालकाला तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकायला आवडत आहेत, असे जर तुम्हाला जाणवले तर यहेज्केल १८:२३ वाचा.] या नियतकालिकात शास्त्रवचनांवर आधारित तर्क वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल.”