आपल्याजवळील मौल्यवान शिकवणींचा खजिना इतरांनाही मिळवण्यास मदत करणे
१ देवाच्या वचनात मौल्यवान शिकवणींचा अमाप खजिना आहे. (स्तो. १२:६; ११९:११, १४) एकदा येशूने राज्याच्या विविध पैलूंचे वर्णन करण्याकरता दृष्टांतांचा उपयोग केला आणि मग आपल्या शिष्यांना असा प्रश्न विचारला: “तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” त्यांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला: “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारांतून नव्या जुन्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे.”—मत्त. १३:१-५२.
२ बायबलचा अभ्यास सुरू केल्यावर आपल्याला जी सत्ये माहीत झाली ती जुन्या खजिन्यासारखी आहेत, असे म्हणता येईल. मग देवाच्या वचनाचा आपण जसजसा अधिक खोलात शिरून अभ्यास करू लागलो तसतसे आपल्याला बायबलमधील आणखी शिकवणी सापडल्या. या नवीन शिकवणी जणू काय नवीन खजिन्याप्रमाणे झाल्या. (१ करिंथ. २:७) शिवाय, ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकडूनही’ आपल्याला नवनवीन शिकवणींचा खजिना मिळत राहतो.—मत्त. २४:४५.
३ या जुन्या व नवीन शिकवणींचा खजिना आपण खूप मोलाचा समजतो. यामुळे आपण आणखी प्रशिक्षण प्राप्त करण्यास, देवाच्या वचनाचे शिक्षक म्हणून अनुभव मिळवण्यास आणि शिकलेल्या मौल्यवान गोष्टी इतरांनाही उदारपणे सांगण्यास प्रवृत्त होतो.
४ येशूकडून शिका: येशूला बायबलमधील शिकवणी इतक्या मोलाच्या वाटल्या, की त्याने लोकांना त्या शिकवणी देण्याकरता खूप मेहनत घेतली. तो थकलेला असतानाही त्याने आपल्या ज्ञान “भांडारातून” खजिना बाहेर काढायचे थांबवले नाही.—योहा. ४:६-१४.
५ देव आणि त्याच्या उद्देशांविषयी खरे ज्ञान नसलेल्या लोकांबद्दल येशूला प्रेम होते म्हणूनच तर त्याने देवाच्या सत्यांबद्दलचा जीवनदायक खजिना त्यांना देऊ केला. (स्तो. ७२:१३) आध्यात्मिक भुकेले असलेल्यांचा त्याला कळवळा आला आणि “तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.”—मार्क ६:३४.
६ येशूचा कित्ता गिरवा: आपल्याजवळ असलेल्या शिकवणींना आपण मौल्यवान समजतो तेव्हा थेट बायबलमधून लोकांना आध्यात्मिक खजिना दाखवण्यास आपणही येशूप्रमाणे उत्सुक असू. (नीति. २:१-५) कधीकधी आपण थकलेलो असलो तरी, बायबलमधील सत्ये कळकळीने इतरांना सांगू. (मार्क ६:३४) या खजिन्याला आपण मनापासून मौल्यवान समजत असल्यामुळे आपण सेवेमध्ये होता होईल तितका भाग घेत राहू.