विरोधाला तोंड देण्यास नवोदितांची तयारी करा
१ एक व्यक्ती जेव्हा बायबलचा अभ्यास करू लागते व “सुभक्तीने आयुष्यक्रमण” करू पाहते तेव्हा सैतान तिला आपले खास लक्ष्य बनवतो. (२ तीम. ३:१२) सोबत काम करणारे लोक, सहविद्यार्थी किंवा शेजारी तिचा विरोध करतील. हितचिंतकसुद्धा जेव्हा नवोदितांचा विरोध करू लागतात तेव्हा मात्र या नवीन शिष्यांना खूप वाईट वाटू शकते.—मत्त. १०:२१; मार्क ३:२१.
२ विरोध होईल याविषयी आधीच सांगितले होते: नवोदितांनी छळाची अपेक्षा केली पाहिजे आणि छळ होतो तेव्हा ते ख्रिस्ताचे खरे शिष्य असल्याचे एक चिन्ह आहे, हे त्यांना समजले पाहिजे. (योहा. १५:२०) काही प्रसंगी, यहोवाच्या साक्षीदारांविषयी चुकीचा समज असल्यामुळे इतरजण आपला विरोध करतात. पण हे लक्षात ठेवा, की आपण येशूचा एक अनुयायी असल्यामुळे आणि देवाचे आज्ञापालन करत असल्यामुळे आपली निंदा केली जाते तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. (प्रे. कृत्ये ५:२७-२९, ४०, ४१) यहोवा आपल्याला प्रेमळपणे मदत करतो याची नवोदितांना खातरी द्या. (स्तो. २७:१०; मार्क १०:२९, ३०) नवोदित जेव्हा आपली सचोटी टिकवून ठेवतात तेव्हा विश्वव्यापी सार्वभौमत्वाच्या वादविषयासंबंधाने ते यहोवाची बाजू घेतात.—नीति. २७:११.
३ अचूक ज्ञान घेण्याचे महत्त्व: समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरीसुद्धा अचूक ज्ञान घेत राहणे किती महत्त्वाचे आहे, हे बायबल विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवा. बायबल विद्यार्थी जे काही शिकत आहे त्याचे मूळ त्यांच्या लाक्षणिक हृदयात धरू नये म्हणून सैतान अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतो. (नीति. ४:२३; लूक ८:१३) म्हणून विश्वासात दृढ होत राहण्याकरता त्यांनी देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान घेत राहिले पाहिजे.—स्तो. १:२, ३; कलस्सै. २:६, ७.
४ धीर दाखवण्याची गरज: कोणत्याही कठीण परिस्थितीत धीर दाखवणे आवश्यक असते व त्यामुळे चांगले परिणाम देखील दिसून येतात. (लूक २१:१६-१९) नवीन लोक विरोध होत असताना धीर दाखवतात तेव्हा त्याचा फायदा त्यांना स्वतःला तसेच इतरांनाही होतो. जे विश्वासूपणे टिकून राहतात त्यांना यहोवा आशीर्वाद देत असल्याचा प्रत्यय येतो.—याको. १:१२.
५ थेस्सलोनिकामधील बांधवांनी केलेली आध्यात्मिक प्रगती पाहून प्रेषित पौलाला आनंद झाला. त्यांच्यासाठी त्याने देवाचे आभार मानले, त्यांच्यापैकी बहुतेकांना त्याने सत्याचा मार्ग दाखवला होता. (२ थेस्सलनी. १:३-५) तसेच आपणही आपल्या बायबल विद्यार्थ्यांना विरोधाला तोंड देण्याकरता तयार केल्यास आपल्यालाही आनंद आणि समाधान मिळू शकते.