प्रचार करण्याचे सोडू नका
१ आपल्या क्षेत्रात वारंवार आणि पुरता प्रचार होत असूनही खूप कमी लोक प्रतिसाद देत असल्याचे कधीकधी आपल्याला वाटेल. तरीपण प्रचार करत राहण्याची काही ठोस कारणे आपल्याजवळ आहेत.—मत्त. २८:१९, २०.
२ साक्षीसाठी: येशूने आधीच सांगितले होते की राज्य प्रचाराचे कार्य ‘युगाच्या समाप्तीच्या’ संयुक्त चिन्हाचा महत्त्वपूर्ण पैलू असेल व हे प्रचार कार्य “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून” केले जाईल. (मत्त. २४:३, १४) राज्याचा प्रचार करताना लोक आपल्याला नुसते पाहत जरी असले तरी याद्वारे त्यांना प्रभावकारी साक्ष मिळते. आपण क्षेत्रातून निघून गेल्यावरही, राज्याचा संदेश ज्यांनी ऐकला नाही असे लोक देखील, कदाचित आपल्या भेटीविषयी अनेक तास किंवा काही दिवस बोलतील. आपण प्रचार का करतो त्याची कारणे लक्षात ठेवल्यास आपण हे कार्य चिकाटीने करत राहू. साक्ष देऊन व येणाऱ्या नाशाविषयी लोकांना बजावून आपण बायबल भविष्यवाणीच्या पूर्णतेत भाग घेत असल्यामुळे यहोवा संतुष्ट होतो.—२ थेस्सलनी. १:६-९.
३ चिकाटीची गरज: आज लोकांसमोर अनेक विकर्षणे आहेत शिवाय त्यांच्याकडे पुरेसा वेळ देखील नाही; यामुळे सत्याबद्दल त्यांची रुची वाढवण्यासाठी आपण चिकाटीने प्रयत्न करण्याची गरज आहे. साक्षीदार एका स्त्रीकडे आठवड्यातून एकदा असे जवळपास वर्षभर जात राहिले, पण यानंतर मात्र तिने त्यांना आपल्या घरात बोलावून बायबलवर चर्चा करण्याचे ठरवले. या चर्चा तिला इतक्या आवडू लागल्या की तिने बायबल अभ्यास करण्याचे ठरवले. ती सभांनाही जाऊ लागली आणि काही दिवसांतच तिने बाप्तिस्मा घेण्याची इच्छा व्यक्त केली.
४ जगाच्या परिस्थितीत झपाट्याने बदल घडून येत आहेत आणि त्याचबरोबर लोकांची मनोवृत्ती देखील बदलत चालल्याचे दिसत आहे. पूर्वी ज्यांनी राज्य संदेशात आवड दाखवली नाही, ते कदाचित आता मनाला उभारी देणार्या राज्याच्या आशेविषयी आवड दाखवतील. केवळ एका जरी व्यक्तीने राज्याचा संदेश ऐकला, तरी आपल्या चिकाटीचे सार्थक होईल.
५ अनेक लोक, जगात “होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत.” (यहे. ९:४) आपल्या प्रचार कार्याच्या परिणामांवरून दिसून येते, की प्रामाणिक मनाचे लोक राज्य संदेशाला प्रतिसाद देत आहेत. (यश. २:२, ३) यास्तव, “शुभवृत्त विदित” करण्याच्या कार्यात चिकाटी दाखवून आपण प्रचार करायचे सोडू नये.—यश. ५२:७; प्रे. कृत्ये ५:४२.