वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०८ पृ. ६
  • प्रश्‍न पेटी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रश्‍न पेटी
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • वेगळे राहात असले तरी त्यांना विसरलो नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • विश्‍वासास आव्हान देणाऱ्‍या वैद्यकीय परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्ही तयारीत आहात का?
    आमची राज्य सेवा—१९९०
  • नर्सेसची महत्त्वपूर्ण भूमिका
    सावध राहा!—२००१
  • नर्सेस आपल्याला त्यांची गरज का आहे?
    सावध राहा!—२००१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ४/०८ पृ. ६

प्रश्‍न पेटी

▪ यहोवाच्या साक्षीदाराने धार्मिक संघटना चालवत असलेल्या इस्पितळातून औषधोपचार घेणे किंवा वृद्धाश्रमात राहणे उचित आहे का?

विविध धार्मिक संघटना इस्पितळे किंवा वृद्धाश्रमे चालवतात. सहसा, ही इस्पितळे किंवा वृद्धाश्रमे, मोठ्या बाबेलीच्या धार्मिक कार्यांना बढावा देण्याकरता स्थापन केलेली नसतात. (प्रकटी. १८:२, ४) एखाद्या धार्मिक संघटनेने कदाचित केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशाने ते इस्पितळ अथवा वृद्धाश्रम सुरू केले असावे. आज, काही इस्पितळांची केवळ नावे धार्मिक आहेत आणि इतर इस्पितळांमधील काही कर्मचारी कदाचित त्या धर्माचे पाळक असतील.

एखाद्या धार्मिक संघटनेशी संलग्न असलेल्या इस्पितळात औषधोपचारासाठी जायचे किंवा नाही किंवा वृद्धाश्रमात दाखल व्हायचे की नाही, हे यहोवाच्या साक्षीदाराने स्वतःच ठरवावे. एखाद्याचा विवेक कदाचित त्याला परवानगी देईल, पण तेच दुसऱ्‍याचा विवेक देणार नाही. (१ तीम. १:५) प्रत्येक जण कदाचित वेगवेगळ्या कारणांवर विचार करून निर्णय घेईल. त्यामुळे असे करणे सुज्ञपणाचे ठरेल.

जसे की, एखाद्या धार्मिक संघटनेद्वारे चालवले जाणारे इस्पितळ किंवा वृद्धाश्रम हे, तुमच्या भागातले एकमेव उपचाराचे केंद्र असेल. किंवा, कदाचित दुसरे इस्पितळ देखील असेल पण धार्मिक नाव असलेल्या इस्पितळात इतर इस्पितळांपेक्षा चांगल्या सोयी असतील. केवळ याच इस्पितळात, अमूकएक उपचार देण्याची सोय असेल किंवा कदाचित याच इस्पितळात तुमचे डॉक्टर किंवा सर्जन येत असावेत. शिवाय कधीकधी, धार्मिक संघटना चालवत असलेल्या या इस्पितळांमध्ये, ख्रिस्ती या नात्याने रक्‍ताच्या वापरबद्दल तुमच्या दृष्टिकोनाचा आदर केला जाईल, परंतु खासगी अथवा सरकारी रुग्णालयांमध्ये कदाचित कोणीही तुमच्या या मतांची कदर करणार नाही. तेव्हा, कोणत्या रुग्णालयात औषधोपचार घ्यायचे हे ठरवताना वरील सर्व गोष्टींचा विचार करायला हवा.

समजा तुम्ही एखाद्या धार्मिक संघटनेमार्फत चालवल्या जाणाऱ्‍या रुग्णालयातून औषधोपचार घेण्याचे ठरवले तरी, तुम्ही ते रुग्णालय पुरवत असलेल्या सेवेचे पैसे देत आहात. ते कोणत्या धर्माशी संलग्न आहे याजशी तुमचा काहीएक संबंध नसतो. जसे की एखादी धार्मिक संघटना एक दुकान चालवत आहे आणि अशा दुकानातून तुम्ही काहीही विकत घेता तेव्हा तुम्ही पैसे देऊन खोट्या धर्माला बढावा देत नाही. तुम्ही फक्‍त विकत घेतलेल्या वस्तूची किंमत मोजत असता.

ख्रिस्ती यानात्याने, तुम्ही खोट्या उपासनेच्या कोणत्याही कार्यात भाग घेत नाही, याची खात्री करणे तर महत्त्वाचेच आहे. शिवाय, या रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्‍या धार्मिक कर्मचाऱ्‍यांना तुम्ही “फादर” किंवा “सिस्टर” म्हणून संबोधणार नाही. (मत्त. २३:९) तुम्ही तेथे केवळ उपचारासाठी गेला आहात, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.

जर रुग्णालयात तुम्हाला दाखल व्हावे लागणार असेल तर तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात व तुमच्या मंडळीतील वडील तुम्हाला भेटायला येतात तेव्हा त्यांना आत सोडावे, असे तुम्ही सांगू शकता. यामुळे तुम्ही जितके दिवस तेथे आहात तितके दिवस वडिलांचे लक्ष तुमच्यावर असल्याची खात्री बाळगू शकता.—१ थेस्सलनी. ५:१४.

आपले कोणी वृद्ध बंधू अथवा भगिनी वृद्धाश्रमात व खासकरून धार्मिक संघटनेकरवी चालवल्या जाणाऱ्‍या वृद्धाश्रमात असतील तर त्यांच्या कौटुंबिक सदस्यांनी, स्थानीय वडिलांनी व मंडळीतील इतरांनी जबाबदारपणे या बंधूभगिनींची आध्यात्मिक काळजी घेतली पाहिजे. हे काम सर्वांनी जबाबदारीने केल्यास, या वृद्ध बंधूभगिनींना खूप प्रोत्साहन मिळेल आणि ते वृद्धाश्रमातील धार्मिक कार्यांत किंवा सणांमध्ये अजाणतेत भाग घेणार नाहीत.

या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे आणि मगच कोणत्या रुग्णालयात उपचार करायचा अथवा वृद्धाश्रमात राहायचे हा निर्णय स्वतः घेतला पाहिजे.—गलती. ६:५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा