वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०८ पृ. ७-८
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००८
आमची राज्य सेवा—२००८
km ४/०८ पृ. ७-८

घोषणा

▪ एप्रिल व मे: टेहळणी बुरूज नियतकालिक. स्मारकविधी आणि त्यानंतरच्या खास जाहीर भाषणाला उपस्थित राहिलेल्या परंतु मंडळीसोबत सक्रिय नसलेल्या आस्थेवाईक लोकांना या महिन्यांमध्ये भेट देण्याचा खास प्रयत्न केला जाईल. अशा भेटी देण्याचा उद्देश, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? ही पत्रिका देणे आणि ज्यांनी अद्याप गृह बायबल अभ्यास स्वीकारलेला नाही अशांबरोबर अभ्यास सुरू करणे हा असला पाहिजे. जून: देवाचा मानवजातीने केलेला शोध (इंग्रजी) किंवा बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी). ज्या मंडळ्यांकडे ही प्रकाशने नाहीत ते एकमात्र खऱ्‍या देवाची उपासना करा (इंग्रजी) हे पुस्तक सादर करू शकतात.

▪ मे महिन्यापर्यंत, २००८ सालच्या प्रांतीय अधिवेशनाचे बॅज कार्ड मंडळ्यांना पाठवण्यात येतील. हे मंडळीच्या भाषेत व प्रचारकांच्या संख्येपेक्षा अधिक पाठवले जातील. पण मंडळ्यांना जर मागणीपेक्षा जास्त कार्ड हवे असतील किंवा ते इतर भाषेत हवे असतील तरच त्या आपली मागणी पाठवू शकतात अन्यथा मागणी पाठवण्याची गरज नाही. मंडळ्या आपली अशा माफक प्रमाणातील मागणी लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) याद्वारे शाखा दप्तराला पाठवू शकतात.

▪ मंडळीच्या सचिवांनी, सामान्य पायनियर सेवेसाठी अर्ज (S-205) व सहायक पायनियर सेवा (S-205b) या अर्जांचा पुरेसा साठा आपल्याजवळ बाळगावा. या फॉर्म्सची मागणी लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्म (S-14) यावर केली जाऊ शकते. या फॉर्म्सचा निदान एका वर्षाचा तरी साठा उपलब्ध ठेवावा. सामान्य पायनियर सेवेचे अर्ज शाखा दफ्तरालाला पाठवताना, ते पूर्णपणे भरलेले आहेत याची खात्री करावी.

▪ सर्व अध्यक्षीय पर्यवेक्षकांच्या आणि सचिवांच्या पत्त्यांची आणि टेलिफोन क्रमांकांची अद्ययावत माहिती शाखा दफ्तराला ठेवावी लागते. तेव्हा, यात केव्हाही काही बदल झाल्यास मंडळीच्या सेवा समितीने प्रिसायडींग ओव्हरसियर/सेक्रटरी चेन्ज ऑफ ॲड्रेस फॉर्म (S-29) भरून, सही करून शाखा दफ्तराला विनाविलंब पाठवावा. टेलिफोनच्या एसटीडी कोडमध्ये बदल झाला असल्यास त्याबद्दल देखील शाखा दफ्तराला कळवणे आवश्‍यक आहे.

▪ तुम्ही दुसऱ्‍या एखाद्या देशास प्रवास करणार असाल व तेथे मंडळीच्या सभा, संमेलन अथवा प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्याची तुमची इच्छा असेल, तर या सभांच्या तारखा, वेळा व ठिकाणे यांविषयी, त्या देशातील काम पाहणाऱ्‍या शाखा दफ्तराकडे चौकशी करावी. शाखा दफ्तरांचे पत्ते चालू वर्षाच्या इयरबुकच्या (इंग्रजी) शेवटल्या पानावर दिले आहेत.

▪ तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? या पत्रिका सर्व मंडळ्यांना पाठवण्यात येतील. या पत्रिका आपल्याजवळ बाळगा आणि नवीन बायबल अभ्यास सुरू करण्याकरता त्यांचा उपयोग करा. विरोध असलेल्या ठिकाणी कार्य करताना, घरमालकाला आस्था असल्याची आधी खातरी करा आणि नंतर उचित असल्यास ही पत्रिका त्यांना द्या.

▪ नवीन प्रकाशने उपलब्ध:

पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या —बंगाली

“बायबल कथांचं माझं पुस्तक” यावरील अभ्यासाचे प्रश्‍न —गुजराती, बंगाली, मराठी

मंडळ्यांनी अभ्यासाचे प्रश्‍न असलेल्या वरील पुस्तिकेची मंडळीच्या पुस्तक अभ्यासाकरता पुरेशी मागणी करावी. ही मागणी कृपया एप्रिल महिन्याच्या साहित्य मागणीसोबतच करावी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा