वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ५/०७ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००७
आमची राज्य सेवा—२००७
km ५/०७ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिकांच्या प्रती. आवड दाखवणाऱ्‍या व्यक्‍तींची, किंवा स्मारकविधी व इतर विशेष सभांना उपस्थित राहणाऱ्‍या पण मंडळीसोबत सक्रिय नसणाऱ्‍या व्यक्‍तींची पुनर्भेट घेताना बायबल काय शिकवते हे पुस्तक देऊन बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. जून: कौटुंबिक सौख्यानंद हे पुस्तक सादर करावे. जुलै व ऑगस्ट: खालीलपैकी कोणतेही ३२-पानी माहितीपत्रक द्यावे. देव खरोखरी आपली काळजी करतो का?, जागृत राहा!, तुम्ही त्रैक्य मानावे का?, नंदनवन आणविणारे सरकार, जीवनाचा काय उद्देश आहे?—तो तुम्हाला कसा शोधता येईल? आणि तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी).

▪ प्रांतीय अधिवेशनांत व शाखा दफ्तरांना चेक द्वारे अथवा डिमांड ड्राफ्टद्वारे पाठवलेल्या वर्गण्या बेंगळूर येथील “वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाला” देय केले पाहिजे.

▪ वडील वर्गाने, विपत्तीच्या तयारीविषयी आणि प्रत्येक प्रचारकाची अद्ययावत संपर्क माहिती ठेवण्याविषयी जुलै ६, २००६ तारीख असलेल्या पत्राची उजळणी करावी. विपत्तीचा संभव असणाऱ्‍या क्षेत्रात, तातडीच्या प्रसंगी अधिक संपर्क माहिती प्राप्त केली पाहिजे. तातडीच्या प्रसंगांव्यतिरिक्‍त, जर आपण जास्त काळ अनुपस्थित राहणार असू जसे की सुटीसाठी किंवा कामानिमित्ताने बाहेर जाणार असू अथवा हॉस्पिटलमध्ये राहणार असू, तर आपल्या अनुपस्थितीविषयी प्रचारकांनी आपल्या मंडळीच्या पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना किंवा इतर एखाद्या वडिलांना सांगणे उचित असेल.

▪ उपलब्ध असलेली नवी प्रकाशने:

“प्रत्येक शास्त्रवचन”—अचूक व लाभदायक, ब्रोशर २ (२००७ सालच्या ईश्‍वरशासित सेवा प्रशालेच्या उपयोगासाठी ब्रोशर) —कन्‍नड, तेलगू, हिंदी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा