सेवा सभा आराखडा
सूचना: आमची राज्य सेवा यात वर्षभर दर आठवडी एका सेवा सभेचे आयोजन केले जाईल. “ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मंडळ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार फेरफार करावे लागतील. उचित असते तेव्हा, अधिवेशनाच्या आदल्या आठवड्याच्या सेवा सभेत १५ मिनिटांसाठी, या महिन्याच्या पुरवणीत तुमच्या मंडळीला लागू होणारा सल्ला व सूचना यांची उजळणी करा. तुमचे अधिवेशन होऊन एक किंवा दोन महिने उलटल्यानंतर, एका सेवा सभेतील १५ ते २० मिनिटे (कदाचित स्थानीय गरजांचा भाग), अधिवेशनातील मुख्य मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी बाजूला ठेवा. संपूर्ण अधिवेशन कार्यक्रमाची ही उजळणी नसेल. तर, क्षेत्र सेवेशी थेट संबंधित असलेल्या कार्यक्रमातील भागांवरच भर द्या. श्रोत्यांना, ते शिकलेल्या माहितीचा आपल्या सेवेत कशाप्रकारे उपयोग करीत आहेत त्यावर टिपणी देण्यास आमंत्रण द्या.
एप्रिल ९ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ८ (५३)
१० मि: स्थानीय घोषणा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज एप्रिल १ आणि सावध राहा! एप्रिल ते जून अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात, प्रचारकाने पुनर्भेटीत उत्तर देण्याकरता घरमालकासमोर एखादा प्रश्न ठेवावा.
१५ मि: “नवे शिष्य बनवण्यात सर्वांचा सहभाग.”a ४ थ्या परिच्छेदावर चर्चा करताना श्रोत्यांना विचारा की बाप्तिस्म्याआधी मंडळीतल्या सदस्यांनी त्यांना कशाप्रकारे प्रोत्साहन दिले. एक किंवा दोन टिपण्यांची आधीच तयारी करून घ्यावी.
२० मि: “ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चाला” प्रांतीय अधिवेशनाची जागतिक जाहिरात मोहीम.b तिसऱ्या परिच्छेदावर चर्चा करताना श्रोत्यांना मागच्या वर्षीच्या प्रांतीय अधिवेशनाच्या पत्रिकांचा वाटप करताना आलेले उल्लेखनीय अनुभव सांगण्याचे निवेदन करावे किंवा २००७ वार्षिक पुस्तकातील (इंग्रजी) पृष्ठ ७ पासून पृष्ठ १० वरील उपशीर्षकातील माहितीचा समावेश करावा.
गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल १६ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. ६ (४५)
१० मि: स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा.
१५ मि: “देवाचे वचन निर्भयपणे सांगा.”c उपलब्ध वेळानुसार श्रोत्यांना परिच्छेदांत उल्लेख केलेल्या शास्त्रवचनांवर टिपणी करण्यास सांगावे.
२० मि: “चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले” - भाग १. टेहळणी बुरूज जानेवारी १, २००५ अंकातील पृष्ठे १२-१४ वरील लेखातील १ ते १० परिच्छेदांवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. पुढच्या आठवड्यातील चर्चेसाठी तयारी म्हणून लेखाचा उर्वरीत भाग वाचून काढण्यास सर्वांना प्रोत्साहन द्यावे.
गीत क्र. १ (३१) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल २३ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. २२ (१३०)
१० मि: स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ८ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्त असणाऱ्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज मे १ आणि सावध राहा! एप्रिल ते जून अंक कसे सादर करावेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे.
१० मि: “प्रामाणिक का असावे?” टेहळणीबुरूज फेब्रुवारी १, २००७ अंकातील पृष्ठे ४-७ वर आधारित भाषण.
२५ मि: “चांगल्याप्रकारे साक्ष देण्याचे प्रशिक्षण मिळालेले” - भाग २. टेहळणी बुरूज जानेवारी १, २००५ अंकातील पृष्ठे १४-१७ वरील लेखातील ११-२४ परिच्छेदांवर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.
गीत क्र. ३ (३२) आणि समाप्तीची प्रार्थना.
एप्रिल ३० ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १७ (१८७)
५ मि: स्थानिक घोषणा. प्रचारकांना एप्रिल महिन्याचा क्षेत्र सेवा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी.
१० मि: स्थानिक गरजा.
३० मि: “आदरयुक्त वर्तनाद्वारे ख्रिस्ताचे अनुकरण करा.”d मंडळीच्या सचिवांनी हा भाग हाताळावा. मंडळीला कोणत्या अधिवेशनास नियुक्त करण्यात आले आहे ते सांगावे. “प्रांतीय अधिवेशनाच्या सूचना” या चौकटीची उजळणी करावी.
गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.
मे ७ ने सुरू होणारा सप्ताह
गीत क्र. १९ (१६४)
१० मि: स्थानीय घोषणा.
१५ मि: उपासनास्थळांची व्यवस्था. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सुसंघटित यातील ११ व्या अध्यायावर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.
२० मि: “लोक घरी भेटत नाहीत तेव्हा.”e हा भाग सेवा पर्यवेक्षकांनी हाताळावा.
गीत क्र. २० (९३) आणि समाप्तीची प्रार्थना.
[तळटीपा]
a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
d एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.
e एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्न उत्तराने लेखाची चर्चा करा.