वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०७ पृ. १
  • ‘देवाचे वचन निर्भयपणे सांगा’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘देवाचे वचन निर्भयपणे सांगा’
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • धैर्याने प्रचार करण्याद्वारे येशूचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवाचे वचन निर्भीडपणे बोलत राहा
    आमची राज्य सेवा—२००५
  • धैर्याने सुवार्ता घोषित करा
    आमची राज्य सेवा—१९९०
  • तुम्ही धैर्याने सुवार्तेची घोषणा करता का?
    आमची राज्य सेवा—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ४/०७ पृ. १

‘देवाचे वचन निर्भयपणे सांगा’

१ शाळेत अथवा कामाच्या ठिकाणी इतरांशी आपल्या विश्‍वासांविषयी बोलण्याची संधी तर मिळाली, पण बोलायचे धैर्यच झाले नाही, अशी कधीकधी तुमची स्थिती होते का? नातेवाईकांना व शेजाऱ्‍यांना किंवा अनोळखी लोकांना अनौपचारिक रित्या साक्ष देणे तुम्हाला कठीण वाटते का? तर मग, “देवाचे वचन निर्भयपणे सांगावयास” प्रत्येक उचित संधीचा फायदा घ्यायला कोणती गोष्ट आपली मदत करू शकेल?—फिलिप्पै. १:१४.

२ कचरू नका: तुमच्या एखाद्या जवळच्या मित्रावर किंवा नातेवाईकावर कोणी खोटा आरोप लावल्यास त्याच्या बाजूने बोलण्यास तुम्ही मागेपुढे पाहाल का? यहोवा तर आपला सर्वात जवळचा मित्र आहे, आणि कित्येक शतकांपासून आजपर्यंत त्याची निंदा केली जात आहे. आपल्या महान देवाच्या वतीने बोलण्याची, त्याच्या पक्षात साक्ष देण्याची अतुलनीय सुसंधी आपल्याला लाभली आहे! (यश. ४३:१०-१२) यहोवाबद्दल असलेले मनःपूर्वक प्रेम आपल्याला इतरांशी बोलण्याच्या आपल्या भीतीवर मात करण्यास मदत करेल आणि मागेपुढे न पाहता, निर्भयपणे सत्याविषयी साक्ष देण्याची प्रेरणा देईल.—प्रे. कृत्ये ४:२६, २९, ३१.

३ आपला संदेश एक आनंदाचा संदेश आहे हे आठवणीत असू द्या. याकडे लक्ष दिल्याने लोकांना चिरकालिक फायदे मिळतील. तेव्हा स्वतःकडे किंवा आपला विरोध करणाऱ्‍यांकडे लक्ष देण्याऐवजी जर आपण प्रचार कार्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित केले तर आपल्याला आपोआपच निर्भयपणे प्रचार करणे शक्य होईल.

४ इतरांची उदाहरणे: देवाच्या वचनाची निर्भयपणे घोषणा करणाऱ्‍यांच्या विश्‍वासू उदाहरणातूनही आपल्याला बळ मिळू शकते. उदाहरणार्थ, हनोख याने अभक्‍त लोकांविरुद्ध यहोवाचे न्यायसंदेश निर्भयतेने जाहीर केले. (यहूदा १४, १५) नोहाच्या प्रचाराकडे लोकांनी दुर्लक्ष केले तरी तो विश्‍वासूपणे प्रचार कार्य करत राहिला. (मत्त. २४:३७-३९) पहिल्या शतकातील ख्रिस्ती “निरक्षर व अज्ञानी” असूनही ते विरोधाला न जुमानता प्रचार करत राहिले. (प्रे. कृत्ये ४:१३, १८-२०) आपल्या प्रकाशनांत वेळोवेळी आधुनिक काळातील अशा व्यक्‍तींच्या जीवन कथा प्रकाशित होत असतात की ज्यांनी यहोवावर विश्‍वास ठेवून मनुष्याच्या भीतीवर मात केली आणि आवेशी सुवार्तिक बनले.

५ तर कठीण परिस्थितीला यशस्वीरित्या तोंड दिलेल्या पुरातन काळातील विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणाकडे लक्ष दिल्याने आपण धैर्य संपादन करू शकतो. (१ राजे १९:२, ३; मार्क १४:६६-७१) त्यांनी निर्भयपणे बोलण्याकरता ‘देवाकडून धैर्य मिळवले.’ आपणही मिळवू शकतो!—१ थेस्सलनी. २:२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा