वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०६ पृ. ८
  • नव्या विभागीय संमेलनाचा कार्यक्रम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नव्या विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • विभागीय संमेलनाचा नवीन कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—१९९५
  • आपली आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यास मदत करणारे विभागीय संमेलन
    आमची राज्य सेवा—२००९
  • नव्या खास संमेलन दिवसाचा कार्यक्रम
    आमची राज्य सेवा—२००६
  • “यथाकाळी” मिळणारे आध्यात्मिक अन्‍न
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ८/०६ पृ. ८

नव्या विभागीय संमेलनाचा कार्यक्रम

या जगाकडे पाहून कदाचित कोणाला वाटेल की ते सर्वकाळ टिकेल. पण देवाचे वचन आपल्याला सांगते की हे खरे नाही. (१ योहा. २:१५-१७) ते आपल्याला हे समजून घेण्यास मदत करते, की पृथ्वीवर ‘संपत्ति साठवणे’ व्यर्थ आहे. देवाच्या लोकांचे मनोबल वाढवण्याकरता २००७ सेवा वर्षाचा विभागीय संमेलन कार्यक्रम “स्वर्गात . . .संपत्ती साठवा” या विषयावर आधारित असेल.—मत्त. ६:१९, २०.

इफिसकर २:२ यात “ह्‍या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपति म्हणजे आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याचा” उल्लेख करण्यात आला आहे. या आत्म्याचा एक पैलू म्हणजे भौतिकवादी विचारसरणी. ज्याप्रकारे हवा चहुकडे असते व लोक त्यातून श्‍वास घेतात, त्याचप्रकारे या “जगाचा आत्मा” चहुकडे दिसून येतो. (१ करिंथ. २:१२) हा प्रभाव अतिशय शक्‍तिशाली असल्यामुळेच तो जणू काय ‘राज्य’ करतो, असा उल्लेख करण्यात आला आहे. नव्या विभागीय संमेलनाचा कार्यक्रम आपल्याला या जगाच्या भौतिकवादी विचारसरणीपासून दूर राहण्यास व आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाच्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष देण्यास साहाय्य करील. (मत्त. ६:३३) शिवाय, आपले सेवाकार्य पार पाडत असताना यहोवावर विसंबून राहण्यास व आपल्यासमोर येणाऱ्‍या सर्व दबावांना व अडचणींना तोंड देण्यासही हा कार्यक्रम आपल्याला मदत करेल.

या संमेलनाच्या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याकरता निश्‍चित योजना आखा आणि कार्यक्रमाकडे “विशेष लक्ष” द्या. (इब्री २:१) ज्या मुद्द्‌यांचा तुम्हाला तुमच्या वैयक्‍तिक जीवनात अथवा सेवाकार्यात उपयोग करता येईल असे मुद्दे थोडक्यात टिपून घ्या. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या संमेलनाला उपस्थित राहिल्यास, तुम्हाला ‘स्वर्गात धन साठवण्याचे’ प्रोत्साहन व मनोबल मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा