वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०६ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००६
आमची राज्य सेवा—२००६
km ८/०६ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

ऑगस्ट २८, २००६ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, जुलै ३ ते ऑगस्ट २८, २००६ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. श्रोत्यांकडे पाहून बोलल्यामुळे आपल्याला उत्तम शिक्षक होण्यास कशी मदत होऊ शकते? (मत्त. १९:२५, २६; प्रे. कृत्ये १४:९, १०) [be पृ. १२४ परि. ३-पृ. १२५ परि. ३]

२. भाषण देताना आपण सहजतेने बोलणे का महत्त्वाचे आहे व कोणती गोष्ट आपल्याला क्षेत्र सेवेत सहजतेने बोलण्यास मदत करू शकते? [be पृ. १२८ परि. १-५, चौकोन]

३. आपण व्यक्‍तिगत स्वच्छतेकडे लक्ष का दिले पाहिजे? [be पृ. १३१ परि. १-३]

४. आपली वेशभूषा आणि आपली केशभूषा यांवरून ‘भिडस्तपणा आणि मर्यादा’ कशी दिसून आली पाहिजे? (१ तीम. २:९) [be पृ. १३१ परि. ४-पृ. १३२ परि. १]

५. आपल्या व्यक्‍तिगत स्वरूपावरून, आपल्याला जगाबद्दल प्रेम आहे हे दिसून येत नाही याची खात्री करण्यासाठी आपण कोणत्या बायबल तत्त्वांचा अवलंब करू शकतो? [be पृ. १३३ परि. २-३]

नेमणूक क्र. १

६. वाचन केल्यामुळे सर्वात मोठा फायदा कोणता होतो? [be पृ. २१ परि. ३]

७. एक व्यक्‍ती सुज्ञ आहे की मूर्ख आहे हे कशावरून ठरवता येते? (नीति. १४:२) [w-MR०४ ११/१५ पृ. २६ परि. ५]

८. “समंजसाला ज्ञानप्राप्ति होणे सोपे असते,” असे का? (नीति. १४:६) [w-MR०४ ११/१५ पृ. २८ परि. ४-५]

९. अभ्यास म्हणजे काय? [be पृ. २७ परि. ३]

१०. यहोवाच्या निर्मिती कार्यांवर मनन केल्यामुळे आपल्यावर कोणता प्रभाव पडतो? [w-MR०४ ११/१५ पृ. ८ परि. ४]

साप्ताहिक बायबल वाचन

११. प्राचीन काळांत, यहोवाने कशाप्रकारे “अनुज्ञा” दिली ज्यामुळे “स्त्रियांची मोठी सेना” “मंगल वार्ता प्रसिद्ध” करू लागली आणि आज हे कसे लागू होते? (स्तो. ६८:११)

१२. कोणत्या कारणामुळे आसाफ, जे बरोबर आहे ते करण्यापासून जवळजवळ थांबलाच होता, पण कशामुळे त्याचे विचार बदलले? (स्तो. ७३:२, ३, १७)

१३. इस्राएलांना देण्यात आलेल्या मान्‍नाला “स्वर्गातले धान्य” आणि “दिव्यदूतांची भाकर” का म्हटले आहे? (स्तो. ७८:२४, २५)

१४. ‘परात्पराचे गुप्त स्थळ’ काय आहे आणि आपण तेथे कसे ‘वास’ करू शकतो? (स्तो. ९१:१, २)

१५. कोणत्या अर्थाने यहोवाच्या भक्‍तांचे मरण त्याच्या दृष्टीने अमोल आहे? (स्तो. ११६:१५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा