वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०६ पृ. १
  • आपल्या ‘आनंदी देवाचे’ अनुकरण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या ‘आनंदी देवाचे’ अनुकरण करा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • “शुभवृत्त विदित करणे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • आपण लोकांना आनंदाची बातमी सांगतो
    आमची राज्य सेवा—२०००
  • सर्वांना गरज आहे अशी सुवार्ता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • सुवार्ता सांगण्यात आनंद मिळवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km ७/०६ पृ. १

आपल्या ‘आनंदी देवाचे’ अनुकरण करा

१ यहोवाची मनापासून इच्छा आहे की लोकांनी आनंदाने राहावे. त्याचे वचन आपल्याला अशा अनेक अद्‌भुत आशीर्वादांविषयी सांगते, जे तो मानवजातीला देऊ इच्छितो. आणि भविष्यात मिळणार असलेल्या या आशीर्वादांबद्दल वाचल्यावर आपले मन आनंदाने व उत्कंठेने प्रफुल्लित होते. (यश. ६५:२१-२५) तर मग, ‘धन्यवादित [“आनंदी,” NW] देवाच्या गौरवाची सुवार्ता’ इतरांना सांगायला आपल्याला आनंद वाटतो हे लोकांना दिसून आले पाहिजे. (१ तीम. १:११) राज्याचा संदेश आपण ज्याप्रकारे सादर करतो त्यावरून हे दिसून आले पाहिजे की आपल्याला समजलेल्या सत्याची आपण मनापासून कदर करतो. तसेच ज्या लोकांशी आपण बोलतो त्यांच्याबद्दल आपल्याला कळकळ आहे हे सुद्धा आपल्या बोलण्याच्या पद्धतीतून दिसून आले पाहिजे.—रोम. १:१४-१६.

२ अर्थात, नेहमीच हसतमुख राहणे इतके सोपे नाही. काही क्षेत्रांत बहुतेकजण राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद देत नाहीत. शिवाय, कधीकधी आपण वैयक्‍तिक समस्यांमुळे काळजीत असतो. पण अशाही परिस्थितीत आनंदी मनोवृत्ती टिकवून ठेवण्याकरता आपण हा विचार केला पाहिजे की आपण जो देवाच्या राज्याचा संदेश सांगत आहोत तो आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी ऐकणे आणि समजून घेणे किती महत्त्वाचे आहे. (रोम. १०:१३, १४, १७) यावर मनन केल्यास, सर्व लोकांच्या तारणाकरता यहोवाने दयाळूपणे ज्या तरतुदी केल्या आहेत, त्यांविषयी आनंदाने सांगत राहणे आपल्याला शक्य होईल.

३ सकारात्मक पैलूंवर भर द्या: आपण लोकांशी कशाविषयी बोलतो याकडेही लक्ष दिले पाहिजे. संभाषणाला सुरुवात करण्यासाठी एखाद्या समस्येचा किंवा अलीकडेच घडलेल्या एखाद्या दुर्घटनेचा उल्लेख करण्यास हरकत नाही. पण त्यानंतर खूप वेळपर्यंत नकारात्मक गोष्टींबद्दलच, किंवा समस्यांबद्दलच आपण बोलत राहू नये. आपल्यावर अशा निराशाजनक नव्हे, तर ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगण्याचे’ काम सोपवण्यात आले आहे. (यश. ५२:७; रोम. १०:१५) देवाने अतिशय उज्ज्वल अशा भविष्याबद्दल जी आश्‍वासने दिली आहेत त्यांवर ही सुवार्ता आधारित आहे. (२ पेत्र ३:१३) तेव्हा, हे लक्षात ठेवून आपण अशीच शास्त्रवचने निवडली पाहिजेत, की जी ‘भग्न हृदयी जनास पट्टी बांधण्यास’ आपल्याला साहाय्य करू शकतील. (यश. ६१:१, २) असे केल्यास, आपल्यापैकी प्रत्येकाला आनंदी मनोवृत्तीने व सकारात्मक पद्धतीने आपला संदेश सादर करता येईल.

४ आपण आनंदी मनोवृत्तीने प्रचार कार्यात सहभाग घेतल्यास आपली ही आनंदी मनोवृत्ती लोकांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा, आपल्या क्षेत्रातल्या लोकांना राज्याची सुवार्ता सांगताना आपण नेहमी यहोवाचे, आपल्या ‘आनंदी देवाचे,’ अनुकरण करण्याचा प्रयत्न करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा