वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०६ पृ. २
  • सेवा सभा आराखडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवा सभा आराखडा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • उपशिर्षक
  • जुलै १० ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै १७ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै २४ ने सुरू होणारा सप्ताह
  • जुलै ३१ ने सुरू होणारा सप्ताह
  • ऑगस्ट ७ ने सुरू होणारा सप्ताह
आमची राज्य सेवा—२००६
km ७/०६ पृ. २

सेवा सभा आराखडा

जुलै १० ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २ (१५)

१० मि:स्थानीय घोषणा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा किंवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असणाऱ्‍या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज जुलै १ आणि सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसा सादर करायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. एका प्रात्यक्षिकात “आम्ही ख्रिस्तीच आहोत,” असे म्हणून संभाषणाला खीळ घालू पाहणाऱ्‍याला कसे उत्तर देता येईल हे दाखवावे.—पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरु कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या पुस्तिका, पृ. ११ पाहावे.

१५ मि:मंडळीची संघटना व नियमन. यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकरता संघटित या पुस्तकातील ४ थ्या अध्यायावर आधारित भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा.

२० मि:“यहोवाच्या अतुल्य गुणांची कदर करायला शिकवा.”a बायबल काय शिकवते या पुस्तकातील १ ल्या अध्यायाच्या शेवटी उजळणीकरता असलेल्या पेटीत जे मुद्दे दिले आहेत त्यांवर मनन करण्याकरता बायबल विद्यार्थ्याला प्रश्‍न विचारून कशाप्रकारे मदत करता येईल हे दाखवावे.

गीत क्र. ६ (४५) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै १७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ८ (५३)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यातून निवडक घोषणा. ऑगस्ट १५, २००० टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठ ३२ वर थोडक्यात चर्चा करा. आपण सुटीकरता दुसऱ्‍या गावी जातो किंवा इतर वेळी आपला नेहमीचा नित्यक्रम बदलला तरीसुद्धा दररोज बायबल वाचण्याची सवय ठेवल्याने किती फायदे मिळू शकतात यावर प्रकाश टाकावा.

१५ मि:नम्रता आणि प्रीती—सेवाकार्याकरता महत्त्वाचे गुण. ऑगस्ट १५, २००२ टेहळणी बुरूज अंकातील पृष्ठे १८-२०, परि. १३-२० यातील माहीतीवर आधारित भाषण.

२० मि:“आपल्या ‘आनंदी देवाचे’ अनुकरण करा.”b प्रचारकांना विचारा की, तुमच्या क्षेत्रात प्रचार कार्य करताना कोणती गोष्ट तुम्हाला आनंदी व सकारात्मक मनोवृत्तीने प्रचार करत राहण्यास मदत करते.

गीत क्र. ४ (४३) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै २४ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २९ (२२२)

१५ मि:स्थानीय घोषणा. जमाखर्च अहवाल वाचून दाखवावा आणि संस्थेकडून मिळालेल्या देणगीच्या पावत्यांचा उल्लेख करावा. पृष्ठ ४ वरील सूचनांचा अथवा तुमच्या क्षेत्राकरता उपयुक्‍त असलेल्या इतर सादरतांचा उपयोग करून टेहळणी बुरूज ऑगस्ट १ अंक व सावध राहा! जुलै-सप्टेंबर अंक कसा सादर करावा हे प्रात्यक्षिकाच्या साहाय्याने दाखवावे. प्रत्येक प्रात्यक्षिकानंतर, घरमालकाची आस्था जागृत करण्यासाठी प्रचारकाने संभाषणाची कशी सुरुवात केली हे पुन्हा सांगावे.

१० मि:“त्यांच्या विश्‍वासू सेवेचे अनुकरणीय उदाहरण.” भाषण. प्रकाशनांत आलेल्या खास पायनियरांच्या दोन तीन अनुभवांचा किंवा मंडळीसोबत सेवा करणाऱ्‍या खास पायनियरांच्या मुलाखतींचा समावेश करावा.—वॉच टावर पब्लिकेशन्स इंडेक्स यात “स्पेशल पायनियर्स” या शीर्षकाखाली पाहावे.

२० मि:स्थिर व अढळ व्हा. (१ करिंथ. १५:५८) अनेक वर्षांपासून विश्‍वासूपणे सेवा केलेल्या प्रचारकांची अथवा पायनियरांची मुलाखत घ्यावी. त्यांना सत्य कसे मिळाले? त्यांनी प्रचार कार्याला सुरुवात केली तेव्हा प्रचार कार्य कशा पद्धतीने केले जात होते? त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? खऱ्‍या उपासनेत अढळ राहिल्यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद अनुभवायला मिळाले आहेत?

गीत क्र. ९ (३७) आणि समाप्तीची प्रार्थना.

जुलै ३१ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. २० (९३)

१० मि:स्थानीय घोषणा. प्रचारकांना जुलै महिन्याचा क्षेत्र सेवेचा अहवाल देण्याची आठवण करून द्यावी. ऑगस्ट महिन्यात आपण कोणते साहित्य सादर करणार आहोत याचा उल्लेख करावा.

१५ मि:स्थानीय गरजा.

२० मि:“चांगल्या सवयी जोपासून अनेक आशीर्वाद मिळवा.”c श्रोत्यांनी चांगल्या आध्यात्मिक सवयी लावून, हा नित्यक्रम टिकवून ठेवण्याकरता कोणती पावले उचलली आणि यामुळे कोणते आशीर्वाद अनुभवता आले याविषयी टिप्पणी करण्यास त्यांना निवेदन करावे.

गीत क्र. २२ (१३०) आणि समाप्तीची प्रार्थना.

ऑगस्ट ७ ने सुरू होणारा सप्ताह

गीत क्र. ४ (४३)

१० मि:स्थानीय घोषणा. आमची राज्य सेवा यात सादरतांचे जे नमुने दिले जातात त्यांत आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या गरजा लक्षात घेऊन फेरबदल कसे करता येतील याविषयी थोडक्यात चर्चा करा.—आमची राज्य सेवा, जानेवारी २००५ अंकातील पृष्ठ ८ वरील माहिती पाहावी.

१५ मि:प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन देणाऱ्‍या सभा. टेहळणी बुरूज मार्च १५, २००२ अंकातील पृष्ठे २४-५ यातील माहितीवर आधारित भाषण. सभांना नियमित येण्याकरता कोणते प्रयत्न करावे लागतात आणि असे केल्यामुळे कोणते फायदे मिळाले आहेत याविषयी एखाद्या प्रचारकाची संक्षिप्त मुलाखत घ्यावी.

२० मि:सेवाकार्यात नवीन पद्धतींचा वापर करण्यास व जुळवून घेण्यास तयार असा. टेहळणी बुरूज डिसेंबर १, २००५ अंकातील, पृष्ठे २८-३० यातील माहितीवर भाषण व श्रोत्यांसोबत चर्चा. परिच्छेद ६-११ यातील माहिती भाषणाच्या रूपात सादर करावी. या भाषणात, पौलाने कशाप्रकारे लोकांच्या गरजांकडे लक्ष दिले, तो कशाप्रकारे जुळवून घेण्यास व नवनवीन पद्धतींचा वापर करण्यास तयार होता याकडे श्रोत्यांचे लक्ष वेधावे. यानंतर श्रोत्यांना १२-१४ या परिच्छेदांच्या प्रश्‍नांवर आपल्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून, टिप्पणी करण्याचे निवेदन करा. सेवाकार्य करताना प्रचारक कशाप्रकारे स्थानीय क्षेत्रातल्या लोकांच्या गरजा, त्यांची परिस्थिती, आणि त्यांची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन संदेश सादर करण्याची आपली पद्धत जुळवून घेऊ शकतात हे एका प्रात्यक्षिकातून दाखवावे.

गीत क्र. १७ (१८७) आणि समाप्तीची प्रार्थना.

[तळटीपा]

a एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

b एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

c एक मिनिटाच्या आत प्रस्तावना संपवून प्रश्‍न उत्तराने लेखाची चर्चा करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा