वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०६ पृ. १
  • प्रचार करण्याकरता संधी निर्माण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रचार करण्याकरता संधी निर्माण करा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • सुवार्ता सादरता
    आमची राज्य सेवा—१९९०
  • दररोज यहोवाची स्तुती करा
    आमची राज्य सेवा—२००९
  • यहोवाची स्तुती दररोज करा
    आमची राज्य सेवा—१९९५
  • अनौपचारिक साक्ष देऊन यहोवाची स्तुती करा
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km २/०६ पृ. १

प्रचार करण्याकरता संधी निर्माण करा

१ ख्रिस्ती मंडळीत सर्वांची परिस्थिती वेगवेगळी आहे. पण आपल्या सर्वांचा दृढनिश्‍चय एकच आहे व तो आहे यहोवाची स्तुती करणे. (स्तो. ७९:१३) आजारपण किंवा इतर कठीण परिस्थितीमुळे आपण सुवार्तेच्या प्रचारकार्यात जास्त भाग घेऊ शकत नसलो तर, प्रचार करण्यासाठी आपण कशाप्रकारे संधी निर्माण करू शकतो?

२ दररोजच्या कार्यांत: येशूचे दररोज लोकांबरोबर उठणे-बसणे व्हायचे तेव्हा तो प्रत्येक संधीचा साक्ष देण्यासाठी उपयोग करायचा. जकात नाक्यावरून जात असताना तो मत्तयाशी बोलला. प्रवास करताना जक्कयशी आणि आराम करताना एका शोमरोनी स्त्रीशी बोलला. (मत्त. ९:९; लूक १९:१-५; योहा. ४:६-१०) आपल्या दररोजच्या कार्यांत आपणही लोकांबरोबर बोलता बोलता साक्ष देऊ शकतो. आपण आपल्यासोबत बायबल आणि काही हस्तपत्रिका व माहितीपत्रके ठेवली तर आपण आपल्या आशेविषयी बोलायला प्रवृत्त होऊ.—१ पेत्र ३:१५.

३ तुम्हाला चालता-फिरता येत नसल्यामुळे घरोघरच्या कार्यात भाग घेता येत नाही का? मग, भेट देणाऱ्‍या वैद्यकीय कर्मचाऱ्‍यांना व तुमचा ज्यांच्याबरोबर संपर्क येतो अशा लोकांना साक्ष देण्यासाठी संधी शोधा. (प्रे. कृत्ये २८:३०, ३१) तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला घराबाहेर पडताच येत नसेल तर तुम्ही टेलिफोनवरून किंवा पत्राने साक्ष देण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? एक भगिनी अगदी नियमाने तिच्या गैर-साक्षीदार कौटुंबिक सदस्यांना पत्र लिहिते. पत्रात ती, बायबलमधील प्रोत्साहनदायक विचार आणि साक्षकार्य करत असताना तिला आलेले अनुभव लिहिते.

४ कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत: यहोवाची स्तुती करण्याची आपली इच्छा आपल्याला कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत सत्याचे बी पेरण्याकरता संधी निर्माण करायला प्रवृत्त करेल. एका आठ वर्षीय मुलाने, सावध राहा! मासिकात चंद्राविषयी जी माहिती वाचली ती आपल्या वर्गाला सांगितली. त्याला ही माहिती कोठून मिळाली हे त्याच्या शिक्षिकेला माहीत झाल्यावर ती नियमितरीत्या टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिके स्वीकारू लागली. कामाच्या ठिकाणी, इतरांना दिसेल अशा ठिकाणी बायबल काय शिकवते? पुस्तक ठेवल्याने लोक प्रश्‍न विचारण्यास प्रवृत्त होतील आणि तुम्हाला साक्ष देता येईल.

५ तुमच्या दैनिक कार्यांत प्रचार करण्याकरता तुम्ही संधी कशा निर्माण करू शकता याविषयी तुम्हाला काही मार्ग माहीत आहेत का? आपल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण “ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ” अर्पण करण्याचा आपल्यापरीने दररोज प्रयत्न करू या.—इब्री १३:१५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा