वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०५ पृ. ६
  • तुमचे मूल महत्त्वाचा निर्णय घेऊ शकेल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे मूल महत्त्वाचा निर्णय घेऊ शकेल का?
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाने शिकवल्याप्रमाणे चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • तुमच्या मुलांना रक्‍ताचा गैरवापर करण्यापासून वाचविणे
    आमची राज्य सेवा—१९९२
  • रक्‍ताने जीवन वाचविणे—कसे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या माहितीपत्रकाच्या अभ्यासासाठी प्रश्‍न
    आमची राज्य सेवा—२००१
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km १२/०५ पृ. ६

तुमचे मूल महत्त्वाचा निर्णय घेऊ शकेल का?

१. साक्षीदारांच्या मुलांनी रक्‍ताच्या वापरासंबंधी कशी भूमिका घेतली आहे? एखादे उदाहरण द्या.

१. कशाविषयी महत्त्वाचा निर्णय? रक्‍त संक्रमणाविषयी. टेहळणी बुरूज मे १, १९९२ अंकात “यहोवाने शिकवल्याप्रमाणे चालत राहा” असे शीर्षक असलेल्या लेखात सांगितल्यानुसार, काही प्रसंगी यहोवाच्या साक्षीदारांच्या लहान मुलांना देखील रक्‍ताविषयीचा देवाचा नियम पाळण्याची आपल्याला इच्छा असल्याचे व रक्‍ताविषयीचा देवाचा नियम आपल्या आईवडिलांइतकाच आपल्यालाही महत्त्वाचा वाटतो हे सिद्ध करावे लागले आहे. तुमच्या अल्पवयीन मुलावरही ही वेळ येऊ शकते का?

२. एका न्यायालयाने रक्‍त संक्रमणास नकार देणाऱ्‍या एका अल्पवयीन मुलीसंबंधी कोणते कायदेशीर प्रमाण लागू केले आणि ख्रिस्ती आईवडिलांना व त्यांच्या अल्पवयीन मुलांना यावरून काय शिकायला मिळते?

२. कायदा काय म्हणतो? संयुक्‍त संस्थानांत, समज आलेल्या अल्पवयीन मुलांना रक्‍त संक्रमण नाकारण्याचा हक्क आहे असे प्रतिपादन करणारे सर्वात उच्च न्यायालय म्हणजे इलिनॉय राज्याचे सर्वोच्च न्यायालय. एका सतरा वर्षांच्या साक्षीदार भगिनीच्या केसची उजळणी करताना न्यायालयाने असा निकाल दिला: “जर अल्पवयीन मूल आपल्या कृतीचा परिणाम समजण्याइतके समंजस आहे व प्रौढ व्यक्‍तीप्रमाणे निर्णय घेण्यास समर्थ आहे असे पुराव्यावरून स्पष्ट व खात्रीलायकपणे दिसत असेल तर समज आलेल्या अल्पवयीन या सिद्धान्तानुसार तिला वैद्यकीय उपचार घेण्याची संमती देण्याचा अथवा तो नाकारण्याचा सर्वसामान्य कायद्यानुसार हक्क आहे.” तेव्हा, स्वतःहून निर्णय घेण्याइतपत मूल समजंस आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता व रक्‍त न घेण्यासंबंधी रुग्णाचे वैयक्‍तिक मत ऐकून घेण्याकरता डॉक्टर किंवा अधिकारी त्याला प्रश्‍न विचारू शकतात. अशावेळी रुग्ण असलेल्या लहान मुलाला आपल्या आजाराच्या गांभीर्याची पूर्ण कल्पना असणे आणि उपचाराच्या विविध पर्यायांचे परिणाम त्याच्या वयानुसार त्याला समजणे आवश्‍यक आहे. तसेच रक्‍तासंबंधी देवाच्या कायद्याबद्दल आपल्या स्वतःच्या धार्मिक विश्‍वासांविषयी त्याला स्पष्टपणे व ठामपणे अभिप्राय मांडता आला पाहिजे.

३. आईवडिलांनी कोणत्या प्रश्‍नांवर गांभीर्याने विचार केला पाहिजे व का?

३. तुमचे मूल काय म्हणेल? तुमची मुले या विषयावर स्वतःच्या भावना व्यक्‍त करू शकतील का? ‘रक्‍त वर्ज्य करावे’ ही देवाची आज्ञा असल्याचे ते पूर्ण मनाने मानतात का? (प्रे. कृत्ये १५:२९; २१:२५) आपल्या विश्‍वासाचे ते शास्त्रवचनांतून स्पष्टीकरण देऊ शकतात का? त्यांचा जीव धोक्यात आहे असे डॉक्टरांचे म्हणणे असेल तरीसुद्धा व आईवडील तेथे उपस्थित नसतील तरीसुद्धा ते निर्भयपणे आपला ठाम निश्‍चय व्यक्‍त करू शकतील का? “समय व प्रसंग हे सर्वांना घडतात;” तेव्हा तुम्ही आपल्या मुलांना त्यांच्या विश्‍वासाची परीक्षा घेऊ शकतील अशा अनपेक्षित प्रसंगांसाठी आधीपासूनच कसे तयार करू शकता?—उप. ९:११; इफिस. ६:४.

४, ५. (क) आईवडिलांवर कोणती जबाबदारी आहे आणि ते ही जबाबदारी कशी पूर्ण करू शकतात? (ख) आईवडिलांना मदत करण्याकरता कोणती साधने उपलब्ध आहेत?

४. आईवडिलांनो, तुम्ही काय करू शकता? रक्‍ताविषयी देवाचा दृष्टिकोन आपल्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी तुमची आहे. (२ तीम. ३:१४, १५) युक्‍तिवाद (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठे ७०-४ यांत या विषयावर स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे. या माहितीचा आपल्या कुटुंबासोबत काळजीपूर्वक अभ्यास करा. पृष्ठे ७४-६ यावरील “समजा एखाद्याने म्हटले—” या शीर्षकाचा उपयोग करून आपल्या मुलांसोबत सराव करावा. यामुळे त्यांना आपले विश्‍वास व त्यामागची कारणे स्पष्टपणे व्यक्‍त करण्यास सोपे जाईल. (१ पेत्र ३:१५) रक्‍त या विषयावर आपल्याला अधिक मार्गदर्शन देण्याकरता इतरही सहायक प्रकाशने उपलब्ध आहेत, उदाहरणार्थ, रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? हे माहितीपत्रक आणि टेहळणी बुरूज जून १५, २००४ अंकातील पृष्ठे १४-२४. याशिवाय, संक्रमण पर्याय—माहितीपट मालिका, (इंग्रजी) असे शीर्षक असलेल्या डिव्हिडीवर सध्या उपलब्ध असलेल्या रक्‍त संक्रमण—पर्यायी उपचार—रुग्णाच्या गरजा व हक्क (इंग्रजी) तसेच रक्‍त संक्रमणाला नकार—वैद्यकशास्त्राने आव्हान पेलले (इंग्रजी) यांसारख्या व्हिडिओपटांतून रक्‍ताविना उपचार व शस्त्रक्रिया करणे सयुक्‍तिक व परिणामकारक आहे याविषयी खात्रीलायक माहिती मिळते. तुम्ही अलीकडे आपल्या कुटुंबासोबत मिळून हे व्हिडिओपट पाहून त्यांवर चर्चा केली आहे का?

५ रक्‍ताविषयी ‘देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घेण्यास’ आपल्या मुलांना मदत करा. मग ते असा महत्त्वाचा निर्णय घेतील ज्यावर यहोवाचा आशीर्वाद आहे.—रोम. १२:२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा