घोषणा
▪ साहित्य सादरता डिसेंबर: सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक सादर करावे. याऐवजी, मंडळीकडे साठा असल्यास, बायबल—देवाचे वचन की मानवाचे? (इंग्रजी), बायबल कथांचं माझं पुस्तक किंवा तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाळ जगू शकाल ही पुस्तकेही सादर करता येतील. जानेवारी: पिवळ्या पडणाऱ्या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. घरमालक पुस्तक घेत नसतील तर जागृत राहा! माहितीपत्रक सादर करा. फेब्रुवारी: यहोवाच्या जवळ या (इंग्रजी) हे पुस्तक सादर केले जाईल. ज्या मंडळ्यांकडे हे पुस्तक नाही त्यांनी प्रकटीकरणाचा कळस किंवा ज्याचा ज्यादा साठा आहे असे जुने प्रकाशन सादर करावे. मार्च: बायबल नेमके काय शिकवते? हे पुस्तक सादर करा. बायबल अभ्यास सुरु करण्याचा विशेष प्रयत्न करा.
▪ प्रत्येक मंडळीच्या प्रमुख भाषेत २००६ सालाच्या स्मारकविधीच्या आमंत्रणपत्रिका लवकरच सर्व मंडळ्यांना पाठवल्या जातील. तुमच्या क्षेत्रात इतर भाषा बोलल्या जात असतील आणि तुम्हाला त्या भाषेत आमंत्रणपत्रिकांचा साठा हवा असेल तर लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मवर (S-14) यांची मागणी लवकरात लवकर करावी. तुमच्या क्षेत्रात ज्या भाषेत आमंत्रण पत्रिका लागतात त्याच भाषांसाठी मागणी पाठवावी.
▪ २००७ सालाचा स्मारकविधी सोमवार, एप्रिल २, या तारखेला, सूर्यास्तानंतर होईल, याची कृपया नोंद घ्यावी. जेथे अनेक मंडळ्या एकच राज्य सभागृह वापरतात तेथील बांधवांना हॉल बुक करण्यासाठी किंवा इतर कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही आगाऊ सूचना दिली जात आहे. स्मारक विधी शांतीने आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा म्हणून भाड्याने घेतलेल्या सभागृहाच्या इमारतीत त्या दिवशी इतर कोणत्या कार्यक्रमामुळे गडबड किंवा गोंधळ होऊ नये, याविषयी वडिलांनी सभागृहाच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना आधीच सांगावे.
▪ ही सभा अतिशय महत्त्वाची असल्यामुळे याप्रसंगी भाषण कोण देणार हे ठरवताना वडील वर्गाने दर वर्षी आलटून पालटून भाषण देण्यापेक्षा किंवा दर वर्षी एकाच बांधवाने भाषण देण्यापेक्षा उत्तम वक्त्याची निवड करावी. अभिषिक्तांपैकी एक अनुभवी बांधव भाषण देण्याकरता उपलब्ध असल्यास त्यांची निवड केली जावी.
▪ ज्या मंडळ्यांना हिंदी, कन्नड व तेलगू भाषेत आमची राज्य सेवा मिळते त्या मंडळ्यांना या भाषेत “प्रत्येक शास्त्रवचन”—विश्वसनीय व फायदेकारक (२००६) या माहितीपत्रकाचा साठा पाठवण्यात आला आहे. या माहितीपत्रकात, सन २००६ दरम्यान ईश्वरशासित सेवा प्रशालेतील नेमणूक क्रमांक १ साठी असलेली माहिती आहे. हिंदी, कन्नड आणि तेलगू भाषांसाठी २००६ सालचा सुधारित ईश्वरशासित सेवा प्रशाला आराखडा लवकरात लवकर पाठवण्यात येईल. वर उल्लेखण्यात आलेल्या कोणत्याही भाषेतील माहितीपत्रकाचा उपयोग करू इच्छिणाऱ्या इतर भाषेच्या मंडळ्या लिटरेचर रिक्वेस्ट फॉर्मचा (S-14) उपयोग करून आपली ऑर्डर पाठवू शकतात.
▪ उपलब्ध असलेले नवीन कंपॅक्ट डिस्क:
थोर शिक्षकाकडून शिका—कंपॅक्ट डिस्कवर (एमपी ३ फॉरमॅट) —इंग्रजी
बायबल कथांचं माझं पुस्तक—कंपॅक्ट डिस्कवर (एमपी ३ फॉरमॅट) —इंग्रजी
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान—कंपॅक्ट डिस्कवर (एमपी ३ फॉरमॅट) —इंग्रजी
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य—कंपॅक्ट डिस्कवर (एमपी ३ फॉरमॅट) —इंग्रजी
सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य—कंपॅक्ट डिस्कवर (एमपी ३ फॉरमॅट) —इंग्रजी
समाधानी जीवन—कसे मिळवता येईल—कंपॅक्ट डिस्कवर (एमपी ३ फॉरमॅट) —इंग्रजी
देव आपल्याकडून काय अपेक्षितो?—कंपॅक्ट डिस्कवर —इंग्रजी, बंगाली, कन्नड, मल्याळम
आपली प्रिय व्यक्ती मरते तेव्हा—कंपॅक्ट डिस्कवर —इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तमीळ, तेलगू
आपल्या आध्यात्मिक वारशाबद्दल कृतज्ञता बाळगणे—कंपॅक्ट डिस्कवर (नाटक) —हिंदी