वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०५ पृ. ५
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००५
आमची राज्य सेवा—२००५
km १२/०५ पृ. ५

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

डिसेंबर २६, २००५ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, नोव्हेंबर ७ ते डिसेंबर २६, २००५ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. उपदेश करताना तो आपण “प्रीतीस्तव” करत आहोत याची खात्री कशी करता येईल? (फिले. ९) [be पृ. २६६]

२. आपण कोणकोणत्या मार्गांनी ‘सुशिक्षणाने बोध करू’ शकतो? (तीत १:९) [be पृ. २६७ परि. १-२]

३. आपली भाषणे प्रोत्साहनदायक असणे महत्त्वाचे का आहे आणि आपण हे कसे करू शकतो? [be पृ. २६८ परि. १-३, चौकोन]

४. मोशेचे अनुकरण करून, आपण इतरांना यहोवाने त्याच्या लोकांकरता काय केले आहे याची आठवण करून दिल्यामुळे त्यांचे मनोबल कसे वाढते? (अनु. ३:२८; ३१:१-८) [be पृ. २६८ परि. ५-पृ. २६९ परि. २]

५. यहोवा सध्या काय करत आहे आणि भविष्यात तो काय करणार आहे याविषयी आपल्या भावना आनंदाने व्यक्‍त केल्यामुळे आपल्या श्रोत्यांना प्रोत्साहन का मिळू शकते? [be पृ. २७०-१]

नेमणूक क्र. १

६. आपण बायबलमध्ये जे काही वाचतो त्याचा आपल्याला फायदा व्हावा म्हणून कोणत्या चार दृष्टिकोनांतून आपण त्या माहितीचे पृथक्करण करावे? [wt पृ. २८, ३०]

७. बायबलमधील भविष्यवाण्यांमध्ये येशूचा कितपत संदर्भ आहे? [wt पृ. ३२, ३३ परि. २]

८. येशूच्या बलिदानावर आपल्याला खरोखर विश्‍वास असल्यास आपण काय करू? [wt पृष्ठे ३९, ४० परि. १४]

९. खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासामुळे आपल्याला कोणकोणत्या बाबतींत स्वातंत्र्य लाभते? [wt पृष्ठ ४४, ४५ परि. ८]

१०. अपरिपूर्ण मानव असूनही यहोवाला खरोखर एकनिष्ट आहोत हे आपण कसे सिद्ध करू शकतो? [wt पृष्ठ ५६, ५७ परि. १४]

साप्ताहिक बायबल वाचन

११. दाविदाला मंदिर बांधण्याची परवानगी देण्यात आली नाही यावरून त्याने लढलेल्या युद्धांना यहोवाची संमती नव्हती असे दिसून येते का? (१ इति. २२:६-१०)

१२. यहोवा केवळ सामूहिकरित्या आपल्या लोकांची काळजी वाहत नाही तर त्याचे भय मानणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीच्या विशिष्ट परिस्थितीची त्याला जाणीव आहे हे मंदिराच्या समर्पणाच्या प्रार्थनेत शलमोनाने कशाप्रकारे व्यक्‍त केले? (२ इति. ६:२९, ३०)

१३. दुसरे इतिहास ११:१५ (NW) यात उल्लेख केलेले “बोकडांच्या आकाराचे दुरात्मे” काय आहेत?

१४. बाशाचे राज्य “राजा आसा याच्या कारकीर्दीच्या तिसऱ्‍या वर्षी” सुरू झाले, व त्याने केवळ २४ वर्षे राज्य केले, तर मग “आसाच्या कारकीर्दीच्या छत्तिसाव्या वर्षी इस्राएलाचा राजा बाशा याने यहूदावर स्वारी केली” याचा कसा अर्थ घेतला जावा? (१ राजे १५:३३; २ इति. १६:१)

१५. दुसरे इतिहास २०:२२, २३ यात सैतानाच्या जगाची लवकरच काय स्थिती होईल याचे सचित्र वर्णन कशाप्रकारे करण्यात आले आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा