इतरांशी बुद्धिवाद करण्याची कला विकसित करा
१. कोणत्या बायबल अहवालाचे आपण परीक्षण करणार आहोत, व का?
१. पिसिदियाच्या अंत्युखियामधील एका सभास्थानांत पौलाने केलेला उपदेश, इतरांबरोबर बुद्धिवाद कसा करायचा याचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रेषितांची कृत्ये १३:१६-४१ मध्ये आपल्याला याविषयी वाचायला मिळेल. जे लोक त्याचा उपदेश ऐकायला आले होते ते कोणत्या पार्श्वभूमीचे आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत कशी आहे या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून त्याने त्यांना सुवार्ता सांगितली. या अहवालाचे परीक्षण केल्यास आपल्याला, पौलाचे अनुकरण आपल्या सेवेत करता येईल.
२. पौलाने आपल्या उपदेशाची सुरुवात ज्या पद्धतीने केली त्यावरून आपण काय शिकतो?
२. समान धागा शोधा: देवाचा उद्देश पूर्ण होण्यात येशूची प्रमुख भूमिका, हे पौलाच्या संदेशाचे मर्म असले तरीसुद्धा त्याने त्याच्या उपदेशाची सुरुवात त्या विषयावर केली नाही. तर त्याने, त्याच्या श्रोत्यांमध्ये बहुसंख्य असलेल्या यहुदी लोकांमध्ये आणि त्याच्यामध्ये असलेल्या समान विचारावर बोलायला सुरुवात केली. जसे की, त्याने यहुदी लोकांच्या इतिहासाविषयी बोलायला सुरुवात केली. (प्रे. कृत्ये १३:१६-२२) तसेच, आपणही जर लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये साम्य असलेल्या विषयांवर बोलायला सुरुवात केली तर त्यांच्या हृदयापर्यंत पोहंचू शकतो. यासाठी आपल्याला व्यवहारचातुर्याने प्रश्नांचा उपयोग करून त्यांचे विचार काढून घ्यावे लागतील. त्यांना कोणत्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या वाटतात हे समजण्याकरता त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घ्यावे लागेल.
३. पौलाच्या श्रोत्यांना, येशू वचनयुक्त मशीहा आहे हे स्वीकारायला जड का जात होते?
३. यहुद्यांच्या इतिहासाची चर्चा करताना, पौलाने श्रोत्यांना दावीदाच्या वंशातून एक तारणकर्ता येईल या देवाने दिलेल्या अभिवचनाची आठवण करून दिली. परंतु, पुष्कळ यहुदी एका शूरवीराची वाट पाहत होते की जो यहुद्यांना रोमनांच्या वर्चस्वाखालून त्यांची सुटका करेल आणि यहुदी राष्ट्राला इतर सर्वांपेक्षा उंच करेल. त्यांना हे पक्के ठाऊक होते, की येशूला जेरुसलेममधील धर्मगुरूंनी नाकारले होते, त्याला रोमी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून ठार मारले होते. पण हाच तर वचनयुक्त मशीहा आहे, हे पौल त्यांना कसे पटवून सांगणार होता?
४. पौलाने यहुदी श्रोत्यांबरोबर कौशल्याने बुद्धिवाद कसा केला?
४. श्रोत्यांनुसार संभाषण निवडा: श्रोत्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीशी पौल परिचित असल्यामुळे त्याने, या यहुद्यांनी ज्या गोष्टी स्वीकारल्या होत्या त्यांच्या आधारावर बुद्धिवाद करण्याकरता शास्त्रवचनांचा उपयोग केला. जसे की, त्याने येशू हा दावीदाच्या वंशाचा आहे व बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याची ओळख करून दिली, असे म्हटले. यहुदी लोक, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला देवाचा संदेष्टा म्हणून ओळखत होते. (प्रे. कृत्ये १३:२३-२५) येशूला नाकारून त्याला मृत्यूदंड देऊन धार्मिक पुढाऱ्यांनी ‘संदेष्ट्यांचे . . . शब्द पूर्ण केले’ होते, असे पौलाने सुचवले. (प्रे. कृत्ये १३:२६-२८) पुढे, येशूला मृतांतून पुन्हा उठवण्यात आल्यानंतर काहींनी त्याला पाहिल्याचे त्याने सांगितले आणि येशूच्या पुनरुत्थानाद्वारे यहुद्यांच्या परिचयाची शास्त्रवचने पूर्ण झाली, याकडे त्याने त्यांचे लक्ष आकर्षित केले.—प्रे. कृत्ये १३:२९-३७.
५. (क) ग्रीक श्रोत्यांसमोर बोलताना पौलाने आपल्या भाषणाचा रोख कसा बदलला? (ख) स्थानीय क्षेत्रात साक्ष देताना आपण पौलाचे उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो?
५. दुसरीकडे पाहता, अथेन्सच्या अरीयपगा येथे एका ग्रीक जनसमूहासमोर भाषण देताना पौलाने एका वेगळ्या पद्धतीचा उपयोग केला. (प्रे. कृत्ये १७:२२-३१) त्याचा संदेश तोच होता. आणि दोन्ही ठिकाणच्या त्याच्या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळाला. (प्रे. कृत्ये १३:४२, ४३; १७:३४) तसेच आज आपणही, आपल्या श्रोत्यांमध्ये समान धागा शोधला आणि त्यांच्या पार्श्वभूमीनुसार व विचारसरणीनुसार त्यांना प्रचार केला तर आपली सेवा देखील प्रभावकारी होऊ शकेल.