वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०५ पृ. ७
  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी
  • आमची राज्य सेवा—२००५
आमची राज्य सेवा—२००५
km १०/०५ पृ. ७

ईश्‍वरशासित सेवा प्रशाला उजळणी

ऑक्टोबर ३१, २००५ ने सुरू होणाऱ्‍या सप्ताहातील ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्‍नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, सप्टेंबर ५ ते ऑक्टोबर ३१, २००५ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्‍नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]

भाषणाचे गुण

१. देवाच्या वचनातून शिकवताना, आपले शिक्षण लोकांच्या लाक्षणिक हृदयापर्यंत पोचावे म्हणून आपण काय करू शकतो? (मत्त. १३:१९) [be पृ. २५८ परि. १-२, चौकोन]

२. एखाद्याच्या मनात काय आहे हे आपण बाहेर कसे काढू शकतो, पण याबाबतीत कोणती गोष्ट आठवणीत ठेवली पाहिजे? [be पृ. २५९ परि. १-२]

३. शिकवताना, यहोवाच्या अद्‌भुत गुणांवर जोर देणे महत्त्वाचे का आहे? [be पृ. २६० परि. १]

४. आपल्या बायबल विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रांत सुधारणा करायची आहे हे समजून घेण्यास आपण त्यांना कशी मदत करू शकतो? [be पृ. २६० परि. ४-पृ. २६१ परि. १]

५. आपल्या बायबल विद्यार्थ्यांना किंवा श्रोत्यांना त्यांच्या कार्यांमागील हेतू पारखण्यास आपण कशी मदत करू शकतो? [be पृ. २६२ परि. २-३]

नेमणूक क्र. १

६. यहोवाचा “झटून शोध” करण्याचा काय अर्थ होतो आणि आपण असे करत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो? (इब्री ११:६) [w-MR०३ ८/१५ पृ. २५ परि. २; पृ. २६ परि. १-२; पृ. २७ परि. २]

७. “सुवचनांचा नमुना” काय आहे आणि आपण या नमुन्याला धरून ठेवतो, हे वडील कसे दाखवू शकतात? (२ तीम. १:१३, १४) [w-MR०३ १/१ पृ. २९ परि. ३-पृ. ३० परि. १]

८. सध्याच्या काळात खऱ्‍या उपासकांत एकता कशी शक्य आहे? [wt पृ. ८ परि. ९]

९. आपण जसजसे देवाविषयी शिकतो तसतसा आपल्या जीवनावर याचा कसा परिणाम होतो? [wt पृ. १५ परि. २]

१०. बायबलच्या सत्याविषयीच्या कोणत्या स्पष्टीकरणांमुळे काही लोकांचा बायबलप्रती दृष्टिकोन बदलला आहे आणि का? [wt पृ. २४ परि. ४]

साप्ताहिक बायबल वाचन

११. दुसरे राजे १३:२१ पवित्र मानल्या जाणाऱ्‍या स्मारक वस्तूंची पूजा करण्याचे समर्थन करते का?

१२. हिज्कियाने ईजिप्तच्या राजाशी संधान बांधले होते का? (२ राजे १८:१९-२१, २५)

१३. अश्‍शूरी बखरींत यहोवाने कशाप्रकारे अद्‌भुतरित्या सन्हेरीबाला पराभूत केले हे सुस्पष्टपणे लिहिलेले नसले तरीसुद्धा या अहवालांत जे म्हटले आहे त्यात लक्ष देण्याजोगे काय आहे? (२ राजे १९:३५, ३६)

१४. शलतिएल कोणाचा पुत्र होता? (१ इति. ३:१६-१८)

१५. राजा शौल याच्या काळात रऊबेनी, गादी व मनश्‍शेच्या अर्ध्या वंशातल्या लोकांनी आजच्या काळातल्या देवाच्या सर्व सेवकांसाठी कोणते चांगले उदाहरण पुरवले? (१ इति. ५:१८-२२)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा