मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज ऑक्टो. १
“भौतिकवादामुळे लोक आज आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे तुम्हाला वाटते का? [उत्तरासाठी थांबा आणि मग पृष्ठ १२ वरील लेख काढा.] या लेखात, आपण आध्यात्मिक आणि भौतिक गरजांत समतोल कसा राखू शकतो याचे स्पष्टीकरण दिले आहे.”—२ करिंथकर ५:७ वाचा.
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“कित्येक गरीब लोकांना आज राहायला व्यवस्थित घरं नाहीत, पण पुष्कळ लोक, चंद्रावर आणि मंगळावर वसाहती करण्याच्या गोष्टी करत आहेत, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटतं का? [उत्तरासाठी थांबा आणि मग यशया ६५:२१, २२ वाचा.] सावध राहा! याच्या या अंकात आपल्या निर्माणकर्त्याने दिलेल्या अभिवचनावर आपण भरवसा का ठेवू शकतो त्याचे वर्णन दिले आहे.”
टेहळणी बुरूज नोव्हें. १
“पुष्कळ लोक जगात चाललेल्या अन्यायामुळे अस्वस्थ आहेत. तुम्हाला काय वाटते, या जगाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य कोणाजवळ आहे का? [उत्तर ऐका.] जगाचा कायापालट करण्यास आड येणारी कारणे या मासिकात सांगितली आहेत. पण या आडकाठींवर कोण मात करेल आणि तो खरी शांती व सुरक्षितता असलेले जग कसे आणेल, हेही यात सांगितले आहे.” स्तोत्र ७२:१२-१४ वाचा.
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“संपूर्ण जगात सोन्याच्या दागिन्यांना खूप भाव आहे. सोने कोठे सापडते हे तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे का? [पृष्ठ २६ वरील चौकोन काढा.] या लेखात, सोने कोठे सापडते फक्त हीच माहिती नव्हे तर त्याचा आज कोणकोणत्या गोष्टींसाठी उपयोग केला जातो त्याचीही माहिती दिली आहे.”