वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०५ पृ. ७
  • घोषणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घोषणा
  • आमची राज्य सेवा—२००५
आमची राज्य सेवा—२००५
km ३/०५ पृ. ७

घोषणा

▪ साहित्य सादरता मार्च: सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे पुस्तक सादर करून गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करावा. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज व सावध राहा! या दोन्ही नियतकालिकांच्या प्रती द्याव्यात. आणखी जाणून घेण्याची इच्छा असलेल्या लोकांकडे, तसेच जे स्मारकविधीला व/किंवा इतर ईश्‍वरशासित कार्यक्रमांना येतात पण मंडळीच्या कार्यांत सक्रिय सहभाग घेत नाहीत अशा व्यक्‍तींकडे पुनर्भेटी करताना देवाची उपासना (इंग्रजी) पुस्तक देण्याचा खास प्रयत्न करावा. यामागचा उद्देश, खासकरून ज्यांनी ज्ञान पुस्तक व अपेक्षा माहितीपत्रकाचा अभ्यास केला आहे त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचा असावा. जून: थोर शिक्षकापासून शिका (इंग्रजी) पुस्तक सादर करा. आपल्याला मुले नाहीत, असे घरमालकाने सांगितल्यास, त्यांना अपेक्षा माहितीपत्रक सादर करा. गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा.

▪ मंडळ्यांनी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकांचे नवीन अंक, मिळाल्याबरोबर प्रचारकांसाठी उपलब्ध करावेत. यामुळे, क्षेत्र सेवेत ती सादर करण्याआधी प्रचारकांना ती वाचण्यास आणि त्यातील विषय समजून घेण्यास मदत होईल. आमची राज्य सेवा देखील मिळाल्याबरोबर लगेच प्रचारकांमध्ये तिचे वाटप करावे. मंडळीच्या पुस्तक अभ्यासाच्या वेळी त्यांचे वितरण केले जाऊ शकते.

▪ तुम्ही दुसऱ्‍या एखाद्या देशात जाणार असाल व तुम्हाला तेथील मंडळीच्या सभांची, एखाद्या संमेलनाची किंवा प्रांतीय अधिवेशनाची माहिती हवी असेल तर, तारखा, वेळ आणि ठिकाण यांबाबतचे तुमचे विनंती पत्र त्या देशांतील कारभार पाहणाऱ्‍या शाखा दफ्तराला पाठवावे. अलीकडच्या वार्षिकपुस्तकाच्या शेवटल्या पानावर तुम्हाला शाखा दफ्तरांचे पत्ते मिळतील.

▪ मंडळीच्या सचिवांनी, सामान्य पायनियर सेवेसाठी अर्ज (S-205) व सहायक पायनियर सेवा (S-205b) या अर्जांचा पुरेसा साठा आपल्याजवळ बाळगावा. या फॉर्म्सची मागणी साहित्य मागणी फॉर्म (S-14) यावर केली जाऊ शकते. या फॉर्म्सचा निदान एका वर्षाचा तरी साठा उपलब्ध ठेवा.

▪ स्मारकविधी गुरुवार मार्च २४, २००५ रोजी असेल. तुमच्या मंडळीच्या सभा गुरुवारच्या असतील तर राज्य सभागृह उपलब्ध असल्यास आठवड्यातील इतर दिवशी घ्याव्यात. हे शक्य नसेल आणि तुमच्या सेवा सभेवर परिणाम होत असेल तर तुमच्या मंडळीला लागू होणारे भाग दुसऱ्‍या सेवा सभेच्या वेळी सादर केले जाऊ शकतात.

▪ अनेक प्रचारकांनी, शाखा दफ्तराला फोन करून यहोवाच्या साक्षीदारांमध्ये सध्या प्रचारात असलेल्या आधुनिक चालीत गायिलेल्या विशिष्ट राज्य गीतांविषयी विचारपूस केली आहे. या गीतांच्या रेकॉर्डींगना संघटनेची मान्यता आहे की नाही, हे ते जाणू इच्छितात. आम्हाला या रेकॉर्डींगविषयी माहीत आहे आणि आम्ही कळवू इच्छितो, की या रेकॉर्डींगना आमची मान्यता नाही. कृपया हे रेकॉर्डींग आपापसात फिरवू नका किंवा इंटरनेटमधून डाऊनलोड करू नका. या माहितीने सदर प्रश्‍नासंबंधी तुमच्या शंका दूर झाल्या असतील अशी आशा करतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा