रक्ताविना उपचार—वैद्यकशास्त्र आव्हान स्वीकारते या व्हिडिओतून लाभ मिळवणे
रक्ताविना असलेल्या औषध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या पर्यायांची तुम्हाला कितपत माहिती आहे? काही संक्रमण पर्याय कोणते आहेत आणि त्यात काय काय केले जाते, हे तुम्हाला माहीत आहे का? हा व्हिडिओ पाहा आणि पुढील प्रश्नांच्या आधारावर आपले ज्ञान पारखा.—टीप: या व्हिडिओत, शस्त्रक्रियेची लहान दृश्ये दाखवण्यात आलेली आहेत तेव्हा, आपल्या लहान मुलांबरोबर हा व्हिडिओ पाहायचा की नाही हे पालकांनी ठरवावे.
(१) कोणत्या मुख्य कारणासाठी यहोवाचे साक्षीदार रक्त संक्रमण स्वीकारत नाहीत आणि हे तत्त्व बायबलमध्ये कोणत्या वचनात आहे? (२) वैद्यकीय सेवेच्या बाबतीत आपल्या सर्वांची काय इच्छा आहे? (३) प्रत्येक रुग्णाला कोणता मूलभूत हक्क आहे? (४) रक्त संक्रमण नाकारणे, तर्कशुद्ध व सुज्ञपणाचे का आहे? (५) शस्त्रक्रियेच्या वेळी खूप रक्तस्राव होत असतो तेव्हा, डॉक्टरांकडे कोणते दोन तातडीचे उपाय असतात? (६) रक्त संक्रमणासोबत आरोग्याचे कोणते धोके संबंधित आहेत? (७) शस्त्रक्रियेच्या वेळी रक्तस्राव कमी करण्यासाठी शल्यचिकित्सकांकडे कोणती उपकरणे असतात? (८) कोणत्याही संक्रमण पर्यायाविषयीची कोणती माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे? (९) रक्त संक्रमणाविना गंभीर आणि जटिल शस्त्रक्रिया करणे शक्य आहे का? (१०) अनेक शल्यचिकित्सक यहोवाच्या साक्षीदारांसाठी काय करावयास तयार आहेत आणि कालांतराने कोणती गोष्ट सर्व रुग्णांसाठी प्रमाणभूत वैद्यकीय सेवा बनू शकते?
व्हिडिओत सादर केलेला कोणतेही उपचार स्वीकारणे हा पूर्णपणे एखाद्याचा व्यक्तिगत आणि जाणीवपूर्वक निर्णय आहे.—पाहा, टेहळणी बुरूज जून १५, २००४, पृ. २२-४, २९-३१ आणि टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, २०००, पृ. ३०-१.