वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०४ पृ. १
  • तुमची मदत हवी आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची मदत हवी आहे
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • बांधवांनो—आत्म्यासाठी पेरा आणि मंडळीतील जबाबदाऱ्‍या हाताळण्यास पुढे या!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • तरुण बांधवांनो, जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येऊ शकता का?
    आमची राज्य सेवा—२०१३
  • जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी पुढे येण्याचे इतरांना प्रशिक्षण द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • वडिलांनो, भार उचलण्यास इतरांना प्रशिक्षण द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km १२/०४ पृ. १

तुमची मदत हवी आहे

१ “आमच्यासाठी तुम्ही जे काही करता त्याबद्दल आभारी आहोत. यामुळे आम्हाला खरोखरच खूप फायदा होतो.” आपल्या ख्रिस्ती वडिलांबद्दल व सेवा सेवकांबद्दल आपल्याला असलेली गुणग्राहकता या शब्दांवरून उचितरीत्या व्यक्‍त होते. देवाच्या संघटनेत वाढ होत असल्यामुळे संपूर्ण जगभरातील जवळजवळ १,००,००० मंडळ्यांत सेवा करण्यासाठी प्रौढ बांधवांची सतत गरज आहे. तुम्ही बाप्तिस्मा घेतलेले बांधव असाल तर तुमची मदत हवी आहे.

२ ‘अध्यक्षाचे काम करण्याची’ इच्छा बाळगा: देवाच्या सेवेत जबाबदारीची कामे प्राप्त करण्याचा तुम्ही कशाप्रकारे प्रयत्न करू शकाल? (१ तीम. ३:१) सर्वात प्रथम, तुम्ही आपल्या जीवनातील सर्व पैलूत एक उत्तम उदाहरण मांडले पाहिजे. (१ तीम. ४:१२; तीत २:६-८; १ पेत्र ५:३) प्रचार कार्यात पूर्ण मनाने सहभाग घ्या आणि इतरांना असे करण्यास मदत करा. (२ तीम. ४:५) बंधूभगिनींविषयी प्रामाणिक आस्था व्यक्‍त करा. (रोम. १२:१३) देवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यास करा आणि “शिकवण्याची कला” विकसित करा. (तीत १:९, NW; १ तीम. ४:१३) वडिलांनी तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्‍या काळजीपूर्वक पूर्ण करा. (१ तीम. ३:१०) तुम्ही कुटुंब प्रमुख असाल तर ‘आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवा.’—१ तीम. ३:४, ५, १२.

३ एखाद्या बांधवाला सेवा सेवक किंवा वडील या नात्याने जबाबदारी मिळते तेव्हा त्याला परिश्रम घ्यावे लागतात आणि आत्म-त्यागाचा आत्मा दाखवावा लागतो. (१ तीम. ५:१७) यास्तव, ‘अध्यक्षाचे काम करू पाहताना’ इतरांची नम्रतेने सेवा करण्यावर आपले लक्ष केंद्रित करा. (मत्त. २०:२५-२८; योहा. १३:३-५, १२-१७) तीमथ्याच्या मनोवृत्तीवर मनन करा आणि त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. (फिलि. २:२०-२२) तीमथ्याला जसे सर्व नावाजीत होते तसेच तुम्ही देखील आपले आचरण उत्तम ठेवा जेणेकरून बंधूभगिनी तुम्हाला देखील नावाजतील. (प्रे. कृत्ये १६:१, २) अधिक जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यासाठी तुम्ही जसजसे आध्यात्मिक गुण विकसित करता आणि तुम्हाला मिळणाऱ्‍या सल्ल्यानुसार तुम्ही जसजशी सुधारणा करता तसतशी ‘तुमची प्रगती सर्वांस दिसून येईल.’—१ तीम. ४:१५.

४ पालकांनो, आपल्या मुलांना मदत करायचे प्रशिक्षण द्या: मुले बालपणापासूनच मदत करण्यास शिकू शकतात. त्यांना, सभांमध्ये लक्ष देऊन ऐकण्याचे, प्रचार करण्याचे, राज्य सभागृहात व शाळेत आपल्या आचरणात एक उत्तम उदाहरण मांडण्याचे प्रशिक्षण द्या. राज्य सभागृहाच्या स्वच्छतेत भाग घेणे, वृद्ध बंधूभगिनींना मदत करणे, इत्यादी कार्यात भाग घेऊन इतरांची सेवा करण्यास त्यांना शिकवा. त्यागातून मिळणारा आनंद त्यांना अनुभवू द्या. (प्रे. कृत्ये २०:३५) अशाप्रकारच्या प्रशिक्षणामुळे त्यांना, उद्याचे पायनियर, सेवा सेवक किंवा वडील होण्यास मदत मिळेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा