वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०४ पृ. १
  • तुम्ही मदतीचा हात पुढे करू शकाल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही मदतीचा हात पुढे करू शकाल का?
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला इतरांना मदत करायची “इच्छा” आहे का?
    आमची राज्य सेवा—२००२
  • विश्‍वासू वयोवृद्धांची आठवण ठेवा
    आमची राज्य सेवा—२००२
  • इतरांना मदत करण्याचा एक मार्ग कोणता?
    आमची राज्य सेवा—२०१३
  • आपण विश्‍वासात स्थिर कसे राहू शकतो?
    आमची राज्य सेवा—२०००
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ११/०४ पृ. १

तुम्ही मदतीचा हात पुढे करू शकाल का?

१ आपल्या एकनिष्ठ सेवकांना मदतीचा हात पुढे करण्याकरता यहोवा नेहमी विविध मार्ग शोधत असतो. (२ इति. १६:९; यश. ४१:१०, १३) काळजी वाहणाऱ्‍या एका मेंढपाळाशी यहोवाची तुलना करत यशयाने असे लिहिले: “तो आपल्या हाताने कोकरे एकवटील आणि ती आपल्या उराशी धरून वाहील, व ज्यांना तान्ही पिल्ले आहेत त्यांना तो जपून नेईल.” (यश. ४०:११, पं.र.भा.) यहोवाच्या प्रेमळ काळजीचे आपणही कोणकोणत्या मार्गांनी अनुकरण करू शकतो त्याचा आपण विचार करू या.

२ नवोदितांना मदतीचा हात देणे: आपल्याबरोबर उभारणीकारक संगतीचा आनंद लुटण्याकरता नवोदितांना आमंत्रित करण्याद्वारे आपण त्यांना मदतीचा हात देऊ शकतो. (नीति. १३:२०) आपण जेव्हा मंडळीत जाऊ लागलो तेव्हा इतरांनी मदतीचा हात कसा पुढे केला ते सांगताना एक बांधव म्हणाला: “एक कुटुंब विशेषकरून मला नेहमी त्यांच्या कौटुंबिक अभ्यासाच्या वेळी बोलवायचे. मी जशी प्रगती करू लागलो तसे एक पायनियर जोडपं मला नेहमी त्यांच्याबरोबर पूर्ण दिवस सेवेत येण्यासाठी आमंत्रण द्यायचं. आम्ही नेहमी आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करायचो. ख्रिस्ती होण्याआधी, मी शुक्रवार-शनिवार रात्रीचं बाहेर जायचो. पण ख्रिस्ती झाल्यानंतर मला बाहेर जायची गरज पडली नाही, सहचर्याची माझी गरज बांधवांनी पूर्ण केली.” मंडळीतील बंधूभगिनींनी या बांधवाला दाखवलेल्या प्रेमळ काळजीमुळे त्याला विश्‍वासात आणखी मुळावण्यास मदत झाली; आता तो बेथेल कुटुंबाचा एक सदस्य म्हणून सेवा करत आहे.—कलस्सै. २:६, ७.

३ एकमेकांची उभारणी करा: आपल्या बांधवांसमोर कठीण परिस्थिती येते तेव्हा त्यांना मदतीचा हात देण्याची आपल्याला एखादी संधी दिसेल. आजारी असलेल्या प्रचारकाबरोबर टेलिफोनवरून साक्षकार्य करण्याची तुम्ही व्यवस्था करू शकता का, किंवा तुमच्या बायबल विद्यार्थ्याला या आजारी बांधवाच्या/बहिणीच्या घरी येण्यास सांगून तुम्ही या आजारी बंधूला अथवा बहिणीला तुमच्याबरोबर बायबल अभ्यासासाठी बसण्यासाठी आमंत्रित करू शकता का? लहान बाळ असलेल्या एखाद्या पालकाला सेवेत तुम्ही मदतीचा हात पुढे केल्यास ते नक्कीच तुमचे आभार मानतील. पुनर्भेटी करण्यास किंवा सेवेच्या इतर पैलूत भाग घेण्यास लाजत असलेल्या प्रचारकांना तुम्ही मदतीचा हात पुढे करता तेव्हा त्यांना आनंद वाटणार नाही का? बांधवांमध्ये प्रेमळ आस्था आपल्याला त्यांची उभारणी करण्याचे मार्ग शोधण्यास प्रवृत्त करेल.—रोम. १४:१९.

४ यहोवा आपल्या सेवकांची कशी कोमलतेने काळजी घेतो हे पाहून आपण त्याचे अनुकरण करतो तेव्हा आपण एकमेकांना मजबूत करतो, मंडळीतील प्रेमाची वीण आणखी घट्ट करतो आणि आपल्या स्वर्गीय पित्याचे गौरव करतो.—इफिस. ४:१६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा